Uddhav Thackeray Slams – राज्यातील २९ महानगरपालिकांच्या (Municipal corporations) निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी महायुतीवर बोचरी टीका केली. सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक अत्यंत घाणेरड्या पद्धतीने, साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून लढवली. मात्र तरीही शिवशक्तीने (Shiv Shakti) यश मिळवले आहे. भाजपा (BJP) हा जमिनीवरचा नाही तर कागदावरचा पक्ष आहे. त्यांनी कागदावरची शिवसेना संपवली पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही अशी टीका देखील त्यांनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी जाऊ शकलो नाही. तीन महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो. चंद्रपुरातही शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आलेत. सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची दिलगिरी व्यक्त करतो. या निवडणुका सत्ताधारी पक्षाकडून विचित्र आणि अत्यंत घाणेरड्या पद्धतीने लढवल्या गेल्या. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याच्य पद्धतीने साम, दाम, दंड, भेद याच्या पलिकडे जाऊन त्यांनी सर्वकाही वापर केला. धाक दाखवणे, पैशांची लालूच, काही शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटीसी, काहींना अटक केली. दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले.ठाण्यातील उमेदवारांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले. काहींना बळजबरीने उमेदवारी मागे घ्यायला लावल्या. मुंबईत आमचा महापौर व्हावा, अशी इच्छा होती. तो आकडा आजतरी गाठू शकलो नाही. पण त्यांच्या खेळाला उत्तर देऊन शिवशक्तीने जे यश मिळवले, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद | शिवसेना भवन, दादर, मुंबई – #LIVE https://t.co/JwDz0FhqN2
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 17, 2026
मुंबईत आमचा महापौर व्हावा, अशी इच्छा होती. तो आकडा आजतरी गाठू शकलो नाही. पण त्यांच्या खेळाला उत्तर देऊन शिवशक्तीने जे यश मिळवले, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडलाय. सत्ताधाऱ्यांनी एकही प्रयत्न असा सोडला नाही, जिथे शिवसेना उरणार नाही. एका गणिताचे उत्तर मला मिळाले नाही. आमच्या सभेला शिवाजीपार्क फुलून गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी महायुतीच्या सभेला गर्दी नव्हती. मग त्यांना खुर्च्यांनी मतदान केले का? रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना लगावला.
रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केले का? – उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर टोला
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, . एका गणिताचे उत्तर मला मिळाले नाही. आमच्या सभेला शिवाजीपार्क फुलून गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी महायुतीच्या सभेला गर्दी नव्हती. मग त्यांना खुर्च्यांनी मतदान केले का? रिकाम्या खुर्च्या (empty chairs) मतदान कशा करू शकतात? सत्ताधाऱ्यांनी शिवसेना संपवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. निवडणुकीच्या शेवटच्या चार दिवसांत जे पैशांचे वाटप केले, ते चार दिवसांपूर्वी नव्हता. निवडणुकीच्या तोंडाला सुद्धा मिक्सर, साड्यांचे वाटप झाले. हा पैसा येतो कुठून? त्या पैशाच्या सोर्सच्या मागे ईडी (ED), आयकर विभाग (Income Tax Department), सीबीआय (CBI)लागत कशी नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. २०१५ साली काळा पैसा नाहीसा व्हावा, यासाठी मोदींनी जी नोटबंदी केली होती, ती यशस्वी झाली का? याचे उत्तर देखील शोधले पाहिजे.
भाजपा हा शिवसेना संपवू शकत नाही
भाजपाने कागदावर शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत हे कालच्या निवडणुकीने दाखवून दिलेले आहे. भाजप हा कागदावर आहे, पण जमिनीवर नाहीये. कारण तो जमिनीवर असता, तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते. पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती. यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता. नियम बदलावे लागले नसते, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल

मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संवाद साधताना आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल विधान सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळी केले . शिंदे गटावर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले,गद्दारी करून मिळवलेला विजय हा मुंबई गहाण ठेवण्यासाठी आहे. या पापाला मराठी माणूस कधीही क्षमा करणार नाही. मात्र निष्ठेने लढलेल्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे.
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 17, 2026
या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना वरच्या देवाला महायुतीचा महापौर बसावा अशी इच्छा होती असा मिश्किल टोला लगावला.
🕟 4.25pm | 17-1-2026📍Pune.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2026
LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/j5yRtWkseO
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही बसून हे ठरवणार आहोत. महापौर कोण?, महापौर किती वर्षे? हे सर्व मी आणि शिंदे आणि दोन्ही कडचे नेतेमंडळी आम्ही ते बसून ठरवू. काही त्यामध्ये वाद होणार नाही. छान पद्धतीने आम्ही दोन्ही पक्ष मुंबई चालवून दाखवू.शिवसेनेला मुंबईत म्हणावे तसे यश मिळाले नाही त्यामुळे भाजपाला अडचण आली नाही. त्यांच्याही खूप जागा कमी मतांनी गेल्या आहेत. या सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईत पहिल्यांदा ते ही अशापद्धतीने निवडणूक लढवत होते. त्या मानाने त्यांना चांगले यश मिळाले. अपेक्षा जास्त होती पण काही थोड्या मतांनी जागा गेल्या. महाराष्ट्र यावेळी मोदींसोबत ( Narendra Modi), भाजपसोबत आणि महायुतीसोबत होता. काँग्रेस किंवा कुठलाही पक्ष असो यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला. ‘विरोधी पक्ष राहणार की नाही हे विरोधी पक्षाला विचारले पाहिले. विरोधक झाल्यानंतर विरोध म्हणून भूमिका घ्यावी लागते. घरी बसून विरोधी पक्ष होत नाही.
हे देखील वाचा –
मुंबई देशाचा अभिमान!”; महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ट्विट
अपेक्षित यश न मिळाल्याचे दु:ख! निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया









