Home / राजकीय / BJP National President : भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची २० जानेवारीला निवड होणार

BJP National President : भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची २० जानेवारीला निवड होणार

BJP National President – भारतीय जनता पार्टी (BJP) तीन वर्षांच्या विलंबानंतर मंगळवारी २० जानेवारी रोजी आपल्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड...

By: Team Navakal
BJP National President -
Social + WhatsApp CTA


BJP National President – भारतीय जनता पार्टी (BJP) तीन वर्षांच्या विलंबानंतर मंगळवारी २० जानेवारी रोजी आपल्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून (electoral process) ही निवड केली जाणार आहे.त्यासाठीची अधिसूचना भाजपाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्यसभा सदस्य के लक्ष्मण (Rajya Sabha MP K. Laxman.)यांनी काल जारी केली.

निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार १९ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.त्याच दिवशी अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल.सायंकाळी विजयी उमेदवाराचे नाव घोषित केले जाईल.आवश्यकता भासली तर २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते १.३० यावेळेत प्रत्यक्ष मतदान घेतले जाईल.

उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अवघ्या तीन तासांत पूर्ण होईल. एकूणच या तीन तासांतच नव्या अध्यक्षांचे नाव निश्चित होईल. औपचारिक घोषणा मंगळवारी होणार आहे. कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांची बिनविरोध निवड होणे निश्चित आहे.पक्षाने गेल्या महिन्यात बिहारमधील मंत्री (Bihar minister)आणि पक्षाचे पाच वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांची राष्ट्रीय हंगामी अध्यक्षपदी निवड केली होती.तेच नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील अशी शक्यता आहे.


हे देखील वाचा –

मुंबई देशाचा अभिमान!”; महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ट्विट

अपेक्षित यश न मिळाल्याचे दु:ख! निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

 मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; कधी व कुठे पाहता येईल न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना? वाचा

Web Title:
संबंधित बातम्या