Samrajit Ghatge Removes ‘Tutari’ – शाहू उद्योग समूहाचे प्रमुख आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह हटवल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे समरजित घाटगे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकून भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचरिकता बाकी असल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान कागल मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवार गटाला सुटल्याने समरजित घाटगे नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपा शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना उमेदवारी देत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात थेट मैदानात उतरवले.अटीतटीच्या लढतीत हसन मुश्रीफ यांनी ११,८७९ मतांनी विजय मिळवला.
या पराभवानंतर घाटगे यांना भाजपात परतण्याचे वेध लागले होते. दरम्यान, कागल आणि मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात हातमिळवणी झाली.
या अनपेक्षित आघाडीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. कागल नगरपरिषद निवडणुकीत हसन मुश्रीफ–समरजितसिंह घाटगे आघाडीने २३ पैकी २३ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. पण मुरगुड नगरपालिकेत हीच आघाडी पराभूत झाली. या आघाडीमुळे पक्षाचा पराभव झाल्याच्या भावनेमुळे घाडगेंवर कार्यकर्ते नाराज झाले.
याच नाराजीतून घाटगे यांनी फेसबुकवरील तुतारी हटवल्याने त्यांच्या भाजपाप्रवेशाच्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसापासून समरजीत घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामाराम करुन भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले . कारण त्यांच्या प्रवेशाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, समरजीत घाटगे पुन्हा एकदा भाजपाच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल. समरजीत घाटगे यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार आहे. समरजीत घाटगे महायुतीच्या बैठकीला देखील उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. मात्र या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर घाटगे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष होते. तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अनेक ठिकाणी अनपेक्षित राजकीय युत्या झाल्या. जिल्ह्यातील कागलमध्येही नगरपरिषद निवडणुकीदरम्यान अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले होते.
कागल नगरपालिका निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांच्या आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. कागल नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत या आघाडीने 23 पैकी 23 जागा जिंकत पूर्ण ‘व्हाईट वॉश’ केला. याचबरोबर नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांचा विजय झाल्याने कागलमधील दोन्ही नेत्यांच्या आघाडीवर मतदारांनी स्पष्टपणे विश्वास दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हे देखील वाचा –
Artemis II: १९७२ नंतर पुन्हा मानवी चांद्रमोहीम ६ फेब्रुवारीला यानाचे उड्डाण होणार
संस्कृत की उर्दू? सर्वात जुनी भाषा कोणती? जावेद अख्तर यांनी दिले उत्तर









