Home / देश-विदेश / Nobel Prize Controversy: नोबेल पुरस्कार दान करता येतो का? व्हेंझुएलाच्या नेत्याने पदक ट्रम्प यांना भेट दिल्याने वाद

Nobel Prize Controversy: नोबेल पुरस्कार दान करता येतो का? व्हेंझुएलाच्या नेत्याने पदक ट्रम्प यांना भेट दिल्याने वाद

Nobel Prize Controversy: नोबेल शांतता पुरस्काराच्या इतिहासात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. गेल्या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्या आणि व्हेंझुएलाच्या...

By: Team Navakal
Nobel Prize Controversy
Social + WhatsApp CTA

Nobel Prize Controversy: नोबेल शांतता पुरस्काराच्या इतिहासात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. गेल्या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्या आणि व्हेंझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना माचाडो यांनी त्यांचे सुवर्णपदक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटीदाखल दिले.

या घटनेचे फोटो व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केल्यानंतर जगभरात चर्चेला उधाण आले असून, नोबेल फाउंडेशनने यावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणते नोबेल फाउंडेशन?

नोबेल फाउंडेशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार मानवाच्या कल्याणासाठी मोठे कार्य करणाऱ्यांनाच हा सन्मान दिला जातो. फाउंडेशनने काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत:

  • पुरस्कार हस्तांतरित होऊ शकत नाही: पुरस्काराचा मान आणि सन्मान हा केवळ मूळ विजेत्याच्याच नावे राहतो. जरी पदक किंवा डिप्लोमा दुसऱ्याला दिला तरी इतिहासात विजेते म्हणून मूळ व्यक्तीचीच नोंद असते.
  • पदकावर बंधन नाही: नोबेल फाउंडेशनच्या नियमांनुसार, पदक, डिप्लोमा किंवा मिळालेली बक्षीस रक्कम (सुमारे 1.19 दशलक्ष डॉलर्स) यांचे विजेत्याने काय करावे, यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही.
  • विक्री किंवा भेट: विजेता आपले पदक स्वतःकडे ठेवू शकतो, कोणाला भेट देऊ शकतो किंवा विकू शकतो. मात्र, यामुळे पुरस्काराची ओळख बदलत नाही.

ऐतिहासिक संदर्भ

नोबेल पदक दुसऱ्याला देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत:

  1. 1943: साहित्यातील नोबेल विजेते नट हॅमसन यांनी आपले पदक नाझी प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्स यांना दिले होते.
  2. 2022: दिमित्री मुराटोव्ह यांनी युक्रेनमधील निर्वासित मुलांच्या मदतीसाठी आपले पदक चक्क 100 दशलक्ष डॉलर्सना विकले होते.
  3. 2024: कोफी अन्नान यांच्या पत्नीने त्यांचे पदक संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा कार्यालयाला दान केले होते.

ट्रम्प पदक स्वतःकडेच ठेवणार

व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात डोनाल्ड ट्रम्प हे सोन्याच्या फ्रेममध्ये सजवलेले नोबेल पदक हातात धरलेले दिसत आहेत. ट्रम्प हे पदक आपल्याकडेच ठेवणार असल्याचे अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नोबेल समितीने या कृतीवर थेट भाष्य करणे टाळले असले तरी, पुरस्काराची प्रतिष्ठा जपणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

हे देखील वाचा – Mumbai Mayor :मुंबईचा महापौर कोणाचा? अडीच वर्षांच्या प्रस्तावाच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या