Jio New Plan: तुम्ही जिओचे सिम कार्ड वापरत असाल आणि एका जबरदस्त मंथली प्लॅनच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. रिलायन्स जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने फक्त ५०० रुपयांचा एक विशेष ‘हॅप्पी न्यू ईअर प्लॅन’ सादर केला आहे. या प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर मोफत युट्यूब प्रीमियम आणि अनेक महागड्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
काय आहे ५०० रुपयांचा प्लॅन?
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत ५०० रुपये असून याची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- डेटा: या प्लॅनमध्ये एकूण ५६GB डेटा मिळतो, म्हणजेच युजर्स दररोज २GB हाय-स्पीड डेटाचा वापर करू शकतात.
- कॉलिंग: कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा यात समाविष्ट आहे.
- मेसेजिंग: दररोज १०० मोफत एसएमएस पाठवण्याची सुविधा या प्लॅनमध्ये मिळते.
मोफत मिळणारे OTT सबस्क्रिप्शन
या रिचार्ज प्लॅनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यासोबत मिळणारे मनोरंजनाचे फायदे. ५०० रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला खालील सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल: १. YouTube Premium २. Prime Video (मोबाईल एडिशन) ३. JioHotstar (टीव्ही आणि मोबाईल) ४. Sony LIV ५. ZEE5 ६. Lionsgate Play आणि Discovery+ ७. Sun NXT, Chaupal आणि Planet Marathi यांसारख्या प्रादेशिक सेवा. ८. JioTV आणि JioAICloud.
अतिरिक्त फायदे (Extra Benefits)
केवळ मनोरंजनच नाही, तर जिओ या प्लॅनसोबत काही प्रीमियम सेवाही मोफत देत आहे:
- Google Gemini Pro: हजारो रुपये किंमत असलेला गुगल जेमिनीचा १८ महिन्यांचा प्रो प्लॅन यासोबत पूर्णपणे मोफत मिळेल.
- क्लाउड स्टोरेज: युजर्सना JioAICloud वर ५०GB पर्यंतचे मोफत स्टोरेज दिले जात आहे.
- JioHome: नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना JioHome चा २ महिन्यांचा मोफत ट्रायल कालावधी मिळेल.
कमी किमतीत जास्तीत जास्त फायदे शोधणाऱ्या ग्राहकांसाठी जिओचा हा नवा प्लॅन सध्या बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरला आहे.









