Home / देश-विदेश / New Zealand’s apples : न्यूझीलंडच्या सफरचंदावरील आयात शुल्क कमी केले ! शेतकर्‍यांचा सचिवालयाला घेराव

New Zealand’s apples : न्यूझीलंडच्या सफरचंदावरील आयात शुल्क कमी केले ! शेतकर्‍यांचा सचिवालयाला घेराव

New Zealand’s apples- हिमाचल प्रदेशातील शेकडो शेतकरी-बागायतदार सचिवालयाला घेराव घालण्यासाठी छोटा शिमला येथे आज जमा झाले. पोलिसांनी या आंदोलकांना...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 New Zealand’s apples- हिमाचल प्रदेशातील शेकडो शेतकरी-बागायतदार सचिवालयाला घेराव घालण्यासाठी छोटा शिमला येथे आज जमा झाले. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड उभे केले. मात्र संतप्त शेतकरी-बागायतदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.


न्यूझीलंडहून भारतात येणार्‍या सफरचंदावरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे भारतातील सफरचंदापेक्षा न्यूझीलंडची सफरचंद भारतात स्वस्त मिळणार आहेत. यामुळे भारतीय सफरचंदांची विक्री लक्षणीय कमी होईल. याला विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांनी सिमल्यात एकत्र येत घेराव घातला. केंद्र सरकारने डिसेंबर 2025 मध्ये न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. अमेरिका आणि इतर देशांशीही व्यापार करार होणार आहेत. यामुळे हिमाचलमधील अडीच लाखांहून अधिक सफरचंद उत्पादकांची चिंता वाढली आहे. न्यूझीलंड नंतर इतर देशही आयात शुल्क कमी करण्यासाठी दबाव टाकतील. आयात केलेल्या सफरचंदांमुळे देशाच्या बाजारपेठेत हिमाचलचा 5500 कोटी रुपयांचा सफरचंद उद्योग, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडचाही सफरचंद उद्योग उद्ध्वस्त होईल, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.

—————————————————————————————————————————–

हे देखील वाचा –

चित्रपट फ्लॉप झाल्याने कार्तिक आर्यनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

 मुंबई महापालिकेत मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किल्लेदारांची नियुक्ती

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या