Joshini left politics – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे भाजपा नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी आज सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणार्या अन्यायाबाबत नाराजी नमूद करत 13 मे रोजी आमदारकीची मुदत संपल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री दावोस दौर्यावर असताना त्यांनी हा निर्णय घेतला.
निवृत्ती जाहीर केल्यानंतर नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपा समर्थक जमले होते. त्यांनी जोशी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला . कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी जोशी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून त्यांचा राजकीय संन्यासाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौर्यावरून परत आल्यावर त्यांनी निवृत्तीबाबत निर्णय घेण्याची त्यांनी मागणी केली. यावेळी जोशी यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
संदीप जोशी यांनी निवृत्ती पत्रात नमूद केले की, हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच समाजसेवेची वाट होती. मात्र सध्याच्या राजकीय संस्कृतीत वाढलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि स्पर्धेमुळे निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत. या परिस्थितीत आपणच थांबावे, असा निर्णय मी सखोल विचारांती घेतला आहे. वयाची 55 वर्षे पूर्ण झाल्याने तरुणांना संधी मिळावी, यासाठी माझी जागा रिक्त करणे आवश्यक वाटते. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन. हा निर्णय कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणार्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा असल्याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
आयसीसीशी चर्चा मात्र भारतात सामने न खेळण्यावर बांगलादेश ठाम
संस्कृत की उर्दू? सर्वात जुनी भाषा कोणती? जावेद अख्तर यांनी दिले उत्तर









