BJP’s 12th National President : दिल्लीतील भाजप मुख्यालयात (BJP headquarters) भारतीय जनता पार्टीच्या १२व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन (Nitin Nabeen) यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. अवघ्या ४५व्या वर्षी हे पद स्वीकारत नितीन नबीन हे भाजपाच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी (Nitin Gadkari), माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी नितीन नबीन यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.यावेळी भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मी स्वतःला सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मानतो. पक्षाचा प्रश्न आला की, आज नितीन नबीन हे माझे बॉस आहेत आणि मी एक कार्यकर्ता आहे.
Shri @NitinNabin officially assumed the role of National President of the BJP in the presence of senior party leaders.
— BJP (@BJP4India) January 20, 2026
Here are some highlights ⬇️ pic.twitter.com/3Pr4kXzAPb
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भाजपाचे सध्या प्रमुख लक्ष संघटनेच्या विस्तारावर असून, नवे कार्यकर्ते घडवण्यालाही तितकेच प्राधान्य दिले जात आहे. नबीन यांची जबाबदारी केवळ भाजपाचे संघटन सांभाळण्यापुरती मर्यादित नसून, एनडीएतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचीही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. नितीन नबीन यांच्या संपर्कात जो कोणी येतो, तो त्यांच्या साधेपणा, सरळपणा आणि विनम्र स्वभावाची नक्कीच चर्चा करतो . भाजपा युवा मोर्चाची जबाबदारी असो, विविध राज्यांतील प्रभारीपद असो किंवा बिहार सरकारमधील मंत्रिपद तीन नबीन यांना जे जे कार्य सोपवण्यात आले, ते त्यांनी प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे पार पाडले.
The youth of the country who want to bring new solutions through politics should get opportunities.
— BJP (@BJP4India) January 20, 2026
That is why I want to bring one lakh young people into politics, whose families would be entering politics for the first time.
– PM Shri @narendramodi
Watch full video:… pic.twitter.com/KgRAP1D5Fk
यावेळी माजी अध्यक्ष जे.पी. नड्डा (former BJP President J.P. Nadda)यांनी म्हणाले की, आज भाजपासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तरुण, ऊर्जावान आणि संघटनात्मक अनुभव असलेले नितीन नबीन पदभार स्वीकारत आहेत. मी कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. नितीन नबीन हे मूळ कार्यकर्ते आहे. अगदी लहान वयात ते ५ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेत. बिहार सरकारमध्ये अनेकदा ते मंत्री होते. राष्ट्रीय युवा मोर्चाचे महासचिव म्हणून त्यांनी देशभरात काम केले. सिक्कीम, छत्तीसगड येथे प्रभारी म्हणून काम केले. संघटनेतील अनुभवासोबत त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी पुढे जाईल.
नितीन नबीन म्हणाले की, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशासाठीचे कार्य पाहून आम्ही कार्यकर्ते घडतो. लोकांच्या भावनांशी जोडले गेले, तरच नेतृत्व महान ठरते. एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाच्या नेतृत्वाचा आभारी आहे.
We work with the ideal of 'Nation First, Party Next, and Self Last'.
— BJP (@BJP4India) January 20, 2026
PM Modi connected us with this thought.
It should be our duty that we always work with a 'Nation First' policy.
– Shri @NitinNabin
Watch full video:
https://t.co/BoBFzrCyZX pic.twitter.com/DCVeqW7tXv
नितीन नबीन कोण आहेत ?

नितीन नबीन हे भाजपातील अनुभवी आणि संघटनात्मक पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. त्यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील दिवंगत नबीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. ते पाटणा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चार वेळा बिहार विधानसभेवर निवडून गेले होते.
नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० रोजी रांची (Ranchi) येथे झाला. त्यांनी १९९६ मध्ये पाटणा येथील सीबीएसई शाळेतून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते दिल्लीत गेले आणि १९९८ मध्ये बारावी उत्तीर्ण झाले.
नितीन नबीन हे पाच वेळा बिहार विधानसभेवर निवडून आलेले आमदार असून ते सध्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी २००६ मध्ये पाटणा पश्चिम मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मतदारसंघ फेररचनेनंतर त्यांनी २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ या चार विधानसभा निवडणुकांत बांकीपूरमधून सलग विजय मिळवला.
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा कुमारी यांचा ५१ हजार मतांनी पराभव केला. नितीन नबीन यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar.)यांच्या सरकारमध्ये विविध महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळली आहेत. तसेच त्यांनी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी पार पाडत संघटनात्मक पातळीवर प्रभावी कामगिरी केली आहे.
ते बिनविरोध कसे ?
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झालेल्या संघटनात्मक निवडणुकीत नितीन नबीन बिनविरोध निवडले गेले. या निवडणुकीसाठी के. लक्ष्मण हे रिटर्निंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. नितीन नबीन यांनी सोमवारी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला.
या प्रक्रियेत एकूण ३७ नामांकन संच सादर करण्यात आले आणि ते सर्व अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दुपारी २ ते ४ या वेळेत पार पडली.या ३७ नामांकन संचांपैकी ३६ संच देशातील विविध राज्यांमधून पाठवण्यात आले होते, तर एक संच भाजपा संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला होता. या संचामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ३७ खासदारांचा समावेश होता.
नामांकन अर्ज मागे घेण्याच्या ठरावीक कालावधीनंतर नितीन नबीन यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे कोणताही विरोधी उमेदवार न उभा राहिल्याने नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नेमकी कशी होते?
जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडे (भाजप) अत्यंत मजबूत, शिस्तबद्ध आणि संघटनात्मक रचना आहे. पक्षाच्या माहितीनुसार, भाजपचे १८ कोटींपेक्षा अधिक प्राथमिक सदस्य आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या सदस्यसंख्ये असूनही भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष थेट जनतेतून किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मतदानातून निवडला जात नाही.
ही निवड प्रक्रिया पूर्णतः आंतरिक आणि संघटनात्मक स्वरूपाची आहे. या प्रक्रियेत भारताच्या निवडणूक आयोगाची कोणतीही भूमिका नसते. एखाद्या क्लब किंवा सहकारी संस्थेचा अध्यक्ष जसा आंतरिक पद्धतीने निवडला जातो, त्याच धर्तीवर भाजपमध्येही राष्ट्रीय अध्यक्षांची निवड ही पक्षाची खाजगी आणि संघटनात्मक बाब मानली जाते.
भाजपच्या ४५ वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान झालेले नाही. बहुतांश वेळा एकमतानेच निर्णय घेतला जातो. या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अनौपचारिक पण प्रभावी भूमिका असल्याचे मानले जाते.
जरी भाजपच्या घटनेत स्वयंसेवक संघाचा थेट उल्लेख नसला, तरी संघाचे वरिष्ठ नेते, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस यांच्यातील समन्वयातून अध्यक्षपदासाठीचा उमेदवार निश्चित केला जातो.
निवडणूक प्रक्रियेची सुरुवात कशी होते?
भाजपाच्या पक्षघटनेतील कलम ७ नुसार पक्षातील संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया तळागाळापासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत टप्प्याटप्प्याने राबवली जाते. या प्रक्रियेची सुरुवात सर्वप्रथम गाव पातळीवरील केंद्र किंवा शहरी केंद्रांपासून होते. त्यानंतर स्थानिक समिती, मंडळ, जिल्हा, राज्य आणि अखेरीस राष्ट्रीय पातळीवर निवडणुका घेतल्या जातात.
या संपूर्ण प्रक्रियेचा पाया म्हणजे सदस्यता मोहीम. १८ वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक, जो भाजपची उद्दिष्टे, विचारधारा आणि वचनबद्धता स्वीकारतो, तो पक्षाचा प्राथमिक सदस्य होऊ शकतो. हे सदस्यत्व सहा वर्षांसाठी वैध असते आणि त्यानंतर त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असते.
याच सदस्यतेच्या आधारे पुढील सर्व संघटनात्मक रचना आणि निवडणूक प्रक्रिया उभी राहते.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ किती?
भाजपच्या पक्षघटनेतील कलम २१ नुसार राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. एखादी व्यक्ती सलग दोन टर्म, म्हणजेच कमाल सहा वर्षे राष्ट्रीय अध्यक्षपदावर राहू शकते.
मात्र अलीकडच्या काळात पक्षाच्या गरजेनुसार कार्यकाळ वाढवण्याची प्रथा रूढ झाली आहे. याचे उदाहरण म्हणजे जे. पी. नड्डा. ते २०२० मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांचा कार्यकाळ २०२३ मध्ये संपला असतानाही, २०२४ लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली. आता २०२४ च्या निवडणुकांनंतर २०२६ मध्ये नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यानुसार पक्षाने पुढील नेतृत्व बदलाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आतापर्यंतचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते ?
भाजपाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली. भाजपाच्या राजकीय इतिहासात अनेक नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व केले आहे. १९८० ते १९८६ या काळात अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे वयाच्या ५५ व्या वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर १९८६ ते १९९१ या काळात लालकृष्ण अडवाणी यांनी पक्ष सांभाळले, तेव्हा त्यांचे वय ५८ वर्ष होते. नंतर १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या काळात अडवाणी (L.K. Advani)यांनी पुन्हा तीन वेळा राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले.
१९९१ ते १९९३ या काळात मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi)यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले आणि त्यावेळी त्यांचे वय ५७ वर्षे होते. १९९८ ते २००० या काळात कुशाभाऊ ठाकरे यांनी पक्ष सांभाळले, तर २००० ते २००१ या काळात बंगारू लक्ष्मण, २००१ ते २००२ मध्ये जना कृष्णमूर्ती यांनी पक्षाचे नेतृत्व केले. २००२ ते २००४ या काळात व्यंकय्या नायडू, २००५ ते २००९ आणि २०१३ ते २०१४ या काळात राजनाथ सिंह यांनी पक्ष सांभाळले. २००९ ते २०१३ या काळात नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले.
२०१४ ते २०२० या काळात अमित शाह यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि तेव्हा त्यांचे वय फक्त ४९ वर्षे होते. २०२० ते २०२४ या काळात जे.पी. नड्डा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. आता २०२४ पासून नितीन नबीन हे पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत आणि ते भाजपाच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
हे देखील वाचा –
कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडातील जामिनावर असलेला आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू
महापौराचे ‘अनुसूचित जमाती’चे आरक्षण झालेतर मुंबईत उबाठाचा महापौर! गुरुवारी निर्णय
वसईच्या खोल समुद्रात रहस्यमय गोलाकार रिंगण, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण









