Home / News / BJP Spent Money Like Water on Elections : निवडणुकीवर पाण्यासारखा पैसा भाजपाने 3,335 कोटी खर्च केले

BJP Spent Money Like Water on Elections : निवडणुकीवर पाण्यासारखा पैसा भाजपाने 3,335 कोटी खर्च केले

BJP Spent Money Like Water on Elections – लोकसभा निवडणूक आणि आठ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने खर्चाचा नवा उच्चांक प्रस्थापित...

By: Team Navakal
BJP Spent Money Like Water on Elections
Social + WhatsApp CTA


BJP Spent Money Like Water on Elections –
लोकसभा निवडणूक आणि आठ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने खर्चाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. 2024-25 मध्ये भाजपाने निवडणूक आणि प्रचारावर तब्बल 3,335 कोटी रुपये खर्च केले आहेत. निवडणूक आयोगाने सादर केलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हा खर्च अडीच पट आहे. भाजपाच्या निवडणूक खर्चाचा हा आकडा धक्कादायक आहे.


भाजपाने 2019-20 या वर्षात निवडणूक आणि प्रचारावर 1 हजार 352 कोटी 92 लाख रुपये खर्च केले होते. या काळात 17 वी लोकसभा आणि सात राज्यांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या तुलनेत 2024-25 या निवडणूक वर्षामध्ये भाजपाने अडीच पट अधिक खर्च केला. या काळात 18 वी लोकसभा निवडणूक आणि आठ राज्यांच्या निवडणुका झाल्या.

2024-25 आणि त्याआधीचे वर्ष 2023-24 या दोन वर्षांचा एकत्र विचार केल्यास भाजपाने एकूण 5 हजार 92 कोटी 42 लाख रुपये प्रचारावर खर्च केले आहेत. भाजपाच्या एकूण खर्चापैकी 88 टक्के म्हणजे 3 हजार 774 कोटी 58 लाख रुपये केवळ निवडणूक कामांसाठी वापरण्यात आले आहेत. यात जाहिरात आणि प्रसिद्धीवर सर्वाधिक 2 हजार 257 कोटी रुपये खर्च झाले.

तसेच भाजपाने इलेक्ट्रॉनिक मीडियावर 1 हजार 124 कोटी 96 लाख, विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासावर 583 कोटी 8 लाख रुपये आणि उमेदवारांना आर्थिक मदत म्हणून 312 कोटी 90 लाख रुपये खर्च केले आहेत. भाजपाच्या तुलनेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने 2024-25 मध्ये निवडणूक आणि प्रचारावर 896.22 कोटी रुपये खर्च केले.


सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे (इलेक्टोरल बॉण्ड) योजना बंद केल्यानंतरही भाजपाला देणगी स्वरूपात मिळणार्‍या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. 2023-24 मध्ये भाजपाच्या तिजोरीत 4 हजार 340 कोटी रुपये होते. 2024-25 मध्ये यात वाढ होऊन ही रक्कम 6 हजार 769 कोटी 14 लाख रुपयांवर पोहोचली. 31 मार्च 2025 पर्यंत भाजपाच्या तिजोरीमध्ये 12 हजार 164 कोटी 14 लाख रुपये होते.


हे देखील वाचा –

Web Title:
संबंधित बातम्या