Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena : मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे दुखावले; नगरसेवकांसमोर मांडली मनातली खदखद? मातोश्रीवर नेमकं घडलं काय?

Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena : मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे दुखावले; नगरसेवकांसमोर मांडली मनातली खदखद? मातोश्रीवर नेमकं घडलं काय?

Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena : कल्याण-डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेत (KDMC) मनसेने (MNS) शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणच एकच खळबळ उडाल्याचे दिसून...

By: Team Navakal
Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena : कल्याण-डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेत (KDMC) मनसेने (MNS) शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणच एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले. इतके दिवस केडीएमसीमधे जो खेळ सुरू होताा, तो आम्हाला कुठेच थांबताना दिसत नव्हता. तो थांबवण्यासाठी आम्ही शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. पुढे राजू पाटील म्हणाले राज ठाकरेंना आम्ही आमच्या आकड्यांचं गणित सांगितल होत. त्यावेळी त्यांनी सुचवलं की, तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Raj Thackeray-Uddhav Thackeray)

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवकांना धीर दिल्याचे देखील समोर आले. तसेच तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. नगरसेवकांनी आम्हाला दोन्ही पक्षाकडून संपर्क साधला जात आहे आणि प्रस्ताव समोर ठेवले जात आहेत, याबद्दल नेमकं काय करावं? याबद्दल विचारणा केली आणि उद्धव ठाकरेंच मार्गदर्शन देखील मागितलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितले. मात्र यामध्ये देखील तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू, असं ठाकरेंनी आपल्या नगरसेवकांना म्हटलं. (MNS-Shivsena UBT)

कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव जरी आला तरी पक्ष पातळीवर पक्ष यासंदर्भात निर्णय घेईल, त्यामुळे सध्या तरी विरोधी बाकावर कल्याण डोंबिवलीमध्ये आपणच बसणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांसमोर स्पष्ट केलं. मनसेच्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? हा निर्णय घ्यायला नको होता. जर मनसे आणि आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एक ताकदीचा विरोधी गट कल्याण डोंबिवली महापालिकेत बसला असता, असे उद्धव ठाकरे नगरसेवकांशी संवाद साधताना सांगितले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या