Home / महाराष्ट्र / Adani Group : अदानी समूह महाराष्ट्रात 66 अब्ज डॉलर गुंतवणार

Adani Group : अदानी समूह महाराष्ट्रात 66 अब्ज डॉलर गुंतवणार

Adani Group- दावोस येथील जागतिक आर्थिक मंचच्या बैठकीत अदानी समूहाने महाराष्ट्रासाठी 66 अब्ज अमेरिकन डॉलरचा (अंदाजे सहा लाख कोटी रुपये)...

By: Team Navakal
Adani
Social + WhatsApp CTA

Adani Group- दावोस येथील जागतिक आर्थिक मंचच्या बैठकीत अदानी समूहाने महाराष्ट्रासाठी 66 अब्ज अमेरिकन डॉलरचा (अंदाजे सहा लाख कोटी रुपये) दीर्घकालीन गुंतवणूक आराखडा सादर केला. या आराखड्यात विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांवर आधारित विकास अजेंड्यामध्ये दीर्घकालीक भागीदार म्हणून अदानी समूह काम करणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौर्‍यावर आहेत. त्यांनी 30 लाख कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा केला आहे. त्यात आज अदानी समूहाने (Adani Group) महाराष्ट्रासाठी महत्त्वाची घोषणा केली.


अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी गुंतवणुकीची माहिती देताना सांगितले की, ही गुंतवणूक पुढील सात ते दहा वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. यात 3,000 मेगावॅट एकत्रित क्षमतेचे हरित, एकात्मिक डेटा सेंटर पार्क, विमानतळाजवळील एकात्मिक अरेना, कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प, 8,700 मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प तसेच सरकारच्या खासगी सहभागासाठी विकसित होत असलेल्या धोरणाशी सुसंगत असे सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमधून मालमत्ता निर्मिती ते परिसंस्था उभारणी असा आमचा प्रवास होणार आहे.


अदानी समूहाने दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाची महाराष्ट्रातील ही प्रस्तावित गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर शहरी परिवर्तन आणि पुढील पिढीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर होणार आहे. यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही समावेश आहे. मुंबईच्या मध्यभागी सुमारे 240 हेक्टरमध्ये पसरलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी वस्त्यांपैकी एक असून ती सूक्ष्म उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे हजारो लहान उत्पादन, पुनर्वापर आणि चामड्याच्या वस्तूंची युनिट आहेत. गर्दी, अपुरी जागा, अस्वच्छता आणि जुनी पायाभूत रचना यामुळे धारावीची पुनर्विकासाची गरज दीर्घकाळापासून होती. 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला दिला. या पुनर्विकासात अब्जावधींची गुंतवणूक करून आधुनिक घरे, नागरी सुविधा, सामाजिक पायाभूत रचना आणि व्यावसायिक जागा उभारल्या जाणार आहेत. तसेच पात्र रहिवाशांचे पुनर्वसन करून धारावीच्या अर्थव्यवस्थेला शहराच्या मुख्य विकास प्रवाहात सामावून घेतले जाईल. त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी शहरी नूतनीकरण उपक्रमांपैकी एक ठरणार आहे. नवी मुंबईला एक प्रमुख विकास केंद्र म्हणून उभारण्यावर अदानी समूहाचा भर असून त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक असून 25 डिसेंबरपासून हे विमानतळ सुरू झाला आहे. या विमानतळामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील विमान वाहतूक क्षमतेत वाढ होण्याबरोबरच लॉजिस्टिक्स, आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. अदानी समूहाच्या गुंतवणुकीवर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करायची तर गुंतवणूक आवश्यक आहे. अदानी समूह असो वा अन्य कोणीही सर्व गुंतवणूकदारांचे आम्ही स्वागत करतो.

—————————————————————————————————————————–हे देखील वाचा – 

२९ महापालिकांमध्ये महापौरपदासाठी आरक्षण जाहीर – राज्यात १५ ठिकाणी महिलांच राज्य; वाचा याबद्दलची संपूर्ण माहिती….

 चित्रपट फ्लॉप झाल्याने कार्तिक आर्यनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या