Sahar Sheikh : मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर युनूस शेख यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. या विधानाच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान सहर शेख यांनी लेखी माफीनामा दिला आहे. मुंब्रा येथे झालेल्या एका सभेत त्यांनी “हम मुंब्रा को हरा बना देंगे” असे वक्तव्य केले होते. मात्र हे वक्तव्य पक्षाचा झेंडा आणि निवडणूक चिन्ह यासंदर्भात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
https://www.instagram.com/reel/DT4vCW2CM8y/?igsh=MW9lODh4Y3V5ZmYweA==
“माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगतो आणि तिरंग्यासाठीच मरू. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल तर मी जाहीर माफी मागते,” असे सहर शेख यांनी आपल्या लेखी जबाबात नमूद केले आहे.
https://www.instagram.com/reel/DTuT_hFCNk4/?igsh=bThvbDYwNHdhMno1
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माफी स्वीकारल्याचे सांगितले. “सहर शेख यांचा माफीनामा आला आहे. हिंदूंना चिथावणी देणाऱ्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे. माझ्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. पाठपुराव्यासाठी मी आज पोलीस ठाण्यात गेलो असता ही माहिती मला लेखी स्वरूपात देण्यात आली. आम्ही ही माफी स्वीकारली आहे,” असे सोमय्या यांनी सांगितले.









