Visceral Fat : विसेरल फॅट म्हणजे शरीरातील अंतर्गत चरबी, जी पोटाभोवती साठते आणि ही चरबी आरोग्यासाठी सर्वात धोकादायक मानली जाते. यामुळे हृदयविकार, टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे विसेरल फॅट कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी फक्त व्यायामावर अवलंबून राहणे पुरेसे नाही, तर आहारात योग्य बदल करणे अत्यावश्यक आहे.
विसेरल फॅट शरीराच्या चयापचय प्रक्रियेत अडथळे निर्माण करतो. यामुळे ‘इन्सुलिन रेसिस्टन्स’ वाढतो आणि टाईप २ मधुमेहाचा धोकाही उभा राहतो. काही सुपरफूड्समध्ये अशी वैशिष्ट्यपूर्ण घटक असतात, जे थेट चरबीच्या पेशींवर काम करतात, यकृतावरील ताण कमी करतात आणि शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यात मदत करतात.
१. ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये ‘ईजीसीजी’ (EGCG) नावाचे घटक असतात, जे पोटातील चरबी वितळविण्यास मदत करतात. याचे शोषण अधिक प्रभावी करण्यासाठी त्यात थोडा लिंबाचा रस मिसळून प्यावा. ही पेय पदार्थ फक्त चरबी कमी करत नाहीत, तर शरीरातील चयापचय सुधारतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
२. पालेभाज्या
पालक, ब्रोकली, फुलकोबी, कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये फायबर, सूक्ष्म पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. या भाज्या यकृतासाठी उत्तम असतात आणि शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात. नियमित सेवनामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते, भूक कमी होते आणि परिणामी कॅलरीचे सेवनही नियंत्रित राहते, ज्यामुळे पोटाभोवती चरबी कमी होते.
३. ब्लूबेरी
पोटाभोवती चरबी कमी करण्यासाठी ब्लूबेरी हा उत्कृष्ट पर्याय आहे. यामध्ये ‘अँथोसायनिन’ नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे दाह कमी करतात आणि आतड्यांचे तसेच चयापचयाचे आरोग्य सुधारतात. दररोज ब्लूबेरीचे सेवन केल्यास इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे शरीर चरबी जास्त प्रमाणात जमा करत नाही.
४. अवोकाडो
अवोकाडोमध्ये चांगल्या प्रकारची चरबी (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) असते, जी शरीरातील खराब चरबीच्या प्रमाणाला कमी करून पोटाभोवती चरबी वितळविण्यास मदत करते. हे हृदयासाठीही लाभदायी असते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
५. फॅटी फिश
साल्मन, मॅकेरल, सारडिन्स यांसारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात, जे शरीरातील सूज कमी करतात, चयापचय सुधारतात आणि पोटाभोवती चरबी कमी करण्यात मदत करतात.
६. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे चांगल्या चरबीचे प्रमाण वाढवतात. या तेलाचा समावेश आहारात केल्यास पोटाचा घेर कमी होतो आणि शरीरातील चरबी संतुलित राहते.
७. ग्रीक योगर्ट किंवा प्रोबायोटिक पदार्थ
गिळ्या जिरायुक्त किंवा प्रोबायोटिकयुक्त पदार्थ पचनसंस्थेला सुधारतात, आतड्यांचे आरोग्य टिकवतात आणि चरबी साठवणारे हार्मोन्स संतुलित करतात. संशोधनानुसार, जे लोक नियमित ग्रीक योगर्ट किंवा इतर प्रोबायोटिक पदार्थ घेतात, त्यांचा पोट सपाट राहतो आणि विसेरल फॅटचे प्रमाण कमी होते.









