King Movie Release Date: बॉलिवूडचा ‘बादशहा’ शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख समोर आली असून, हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 24 डिसेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पठाणच्या ऐतिहासिक यशानंतर शाहरुख आणि सिद्धार्थ आनंद हे पुन्हा एकदा किंग चित्रपटानिमित्ताने एकत्र आले आहेत.
“डर नहीं, दहशत हूँ!” – शाहरुखचा दमदार संवाद
चित्रपटाच्या घोषणेसोबतच शाहरुख खानचा एक अतिशय प्रभावशाली संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटात शाहरुख “डर नहीं, दहशत हूँ” असे म्हणताना दिसणार आहे. त्याच्या या संवादामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
टायटल रिव्हिलमधील खास गोष्टी
सिद्धार्थ आनंदने शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे विशेष टायटल रिव्हिल व्हिडिओ चाहत्यांना भेट म्हणून दिले होते. या व्हिडिओमध्ये शाहरुखचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला:
यात शाहरुख चंदेरी केस, कानात विशेष ॲक्सेसरीज आणि एका वेगळ्या शैलीत दिसत आहे.टीझरमध्ये शाहरुखने ‘किंग ऑफ हार्ट्स’चे कार्ड एका शस्त्रासारखे वापरले आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. “सौ देशों में बदनाम, दुनिया ने दिया सिर्फ एक ही नाम-किंग” या ओळीने त्याचे पात्र समोर आणले गेले आहे.
चित्रपटाची स्टारकास्ट आणि निर्मिती
‘किंग’ हा केवळ एक अॅक्शन चित्रपट नसून तो हाय-ऑक्टेन थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची कन्या सुहाना खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त अभिषेक बच्चन आणि दीपिका पदुकोण हे कलाकारही या चित्रपटाचा भाग असणार आहेत.









