Home / महाराष्ट्र / Marathi & Non-Marath Dispute : कल्याणमध्ये मराठी–परप्रांतीयांमध्ये भांडी खरेदीवरून रस्त्यावर वाद

Marathi & Non-Marath Dispute : कल्याणमध्ये मराठी–परप्रांतीयांमध्ये भांडी खरेदीवरून रस्त्यावर वाद

Marathi & Non-Marath Dispute – राज्यात मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद तीव्र होत असतानाच, कल्याण पूर्वेतील कोळसवाडी (Kolsawadi)परिसरात भांडी खरेदीच्या मुद्द्यावरून...

By: Team Navakal
Marathi & Non-Marath Dispute
Social + WhatsApp CTA

Marathi & Non-Marath Dispute – राज्यात मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद तीव्र होत असतानाच, कल्याण पूर्वेतील कोळसवाडी (Kolsawadi)परिसरात भांडी खरेदीच्या मुद्द्यावरून दुकानदार आणि ग्राहकांमध्ये (Marathi customer) वाद झाला. भांड्यांचे दर जास्त सांगितल्याच्या कारणावरून मराठी ग्राहक आणि परप्रांतीय विक्रेत्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. ग्राहक दुकानातून बाहेर पडताच हा वाद अधिक चिघळून परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

ही घटना कल्याण (Kalyan) पूर्वेतील दुकानात घडली. शिवशाही प्रतिष्ठानच्या (Shivshahi Pratishthan) पदाधिकारी व कार्यकर्ते महिलांच्या एका कार्यक्रमाकरिता लकी ड्रॉमध्ये (lucky draw prizes) देण्यासाठी भांडी खरेदीसाठी दुकानात गेले होते. मात्र दुकानदाराने भांड्यांचे दर जास्त सांगितल्याने पदाधिकारी इतर दुकानातून भांडी खरेदी करण्याचा निर्णय घेत दुकानाबाहेर पडले. याच कारणावरून संतप्त झालेला दुकानमालक, त्यांची पत्नी व मुलगी यांनी पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरल्याचा, शिवीगाळ केल्याचा तसेच मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारानंतर शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना घटनास्थळी बोलावण्यात आले. महिलांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित दुकानदाराला (shopkeeper)जाब विचारला. घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


हे देखील वाचा –

राज ठाकरेंचे खाजगी डॉ. यादव दादरला दवाखाना! प्रसिद्धीपासून दूर

पेंग्विन, ट्रम्प आणि ग्रीनलँड; मीम होतय व्हायरल..

वादग्रस्त विधानावरून एमआयएम नगरसेवक सहर शेख यांचा माफीनामा

Web Title:
संबंधित बातम्या