IANS-Adani – अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने ( Adani Group)आता आयएएनएस (IANS) या वृत्तसंस्थेवर ताबा मिळविला आहे.अदानी समूहाची या वृत्तसंस्थेतील हिस्सेदारी आता ७६ टक्के झाली आहे.अदानी समूहाची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्सने वृत्तसंस्था आयएएनएस न्यूजचे ५ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स (Shares) खरेदी केले आहेत.यामुळे एएमजी मीडिया नेटवर्क या वृत्तसंस्थेतील भागीदारी आता ५०.५ टक्क्यांवरून ७६ टक्क्यांवर पोहोचली आहे.यापूर्वी एएमजी मीडियाने (AMG Media) एनडीटीव्ही (NDTV) ग्रुपलाही आपला भाग बनवले होते.
कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, मतदान अधिकार श्रेणीमध्ये एएमजी मीडिया नेटवर्क्सचा हिस्सा ७६ टक्के आणि बिगर मतदान अधिकार श्रेणीमध्ये ९९.२६ टक्के झाला आहे. आयएएनएसच्या संचालक मंडाळाची बैठक १६ जानेवारीला झाली.यामध्ये शेअर् खरेदीच्या निर्णयाला मान्यता दिली . एएमजी मीडिया नेटवर्कने यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये एनडीटीव्हीमधील ६५ टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. कंपनीने २०२२ च्या सुरुवातीला क्विंटिलियन बिझनेस मीडिया देखील खरेदी केले आहे.









