Viral Bhairav Dog – बिजनोर जिल्ह्यातील नगीना गावातील एका प्राचीन हनुमान मंदिरात रविवार, ११ जानेवारीला एक कुत्रा सतत मूर्तीभोवती प्रदक्षिणा (pradakshina) घालत होता. यामुळे स्थानिक आणि भाविकांमध्ये खळबळ उडाली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी हा दैवी चमत्कार मानला आणि कुत्र्याला हनुमानाचा (Lord Hanuman)भक्त अथवा भैरव बाबांचा अवतार म्हणाले.मात्र हा चमत्कार नसून कुत्र्याला झालेल्या गंभीर मानसिक आजार झाल्याने तो गोल फिरत आहे असे पशुवैद्यकीय तज्ञांचे मत होते. त्यांनीच या कुत्र्यावर अखेर उपचार करून त्याचे प्राण वाचवले .
बिजनोर जिल्ह्यातील नगीना (Nagina) गावातील एका प्राचीन हनुमान मंदिरात एक भटका कुत्रा ७२ तास सतत मूर्तीभोवती प्रदक्षिणा घालत होता, ज्यामुळे स्थानिक व भाविकांमध्ये खळबळ उडाली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी हा दैवी चमत्कार मानला आणि कुत्र्याला हनुमानाचा भक्त अथवा भैरव बाबांचा (Bhairav Baba.) अवतार म्हणाले.
थंडीपासून कुत्र्याचे रक्षण करण्यासाठी स्थानिकांनी त्याला मंदिरातील प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये गुंडाळले. त्यांनी असेही सांगितले की, हा कुत्रा फक्त भगवान हनुमानाच्या मूर्तीलाच नव्हे, तर मंदिरातील इतर सर्व देवतांच्या मूर्तींच्या भोवतीही प्रदक्षिणा करत होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला पिण्यासाठी मातीच्या भांड्यात गरम दूध (warm milk)ठेवले, परंतु कुत्र्याने ते प्यायले नाही. त्यानंतर त्याला दोन चपात्या खायला देण्यात आल्या, पण मूर्तींच्या भोवती प्रदक्षिणा करण्यात मग्न असलेल्या कुत्र्याने त्या देखील खाल्या नाहीत.
पहाटे चार वाजल्यापासून अन्न-पाणी नसल्यामुळे कुत्रा खूप अशक्त झाला आणि गुरुवारी संध्याकाळी थकून मंदिरातील गादीवर बसला. तेव्हा पुन्हा त्याला थंडीपासून वाचवण्यासाठी, मंदिर प्रशासनाने ब्लँकेटने झाकले आणि त्याला आरामात झोपवले. दुसऱ्या दिवशी लोक त्याला नैवेद्य आणून पूजा करू लागले. हात जोडून कुत्र्यासमोर नतमस्तक होऊन, ते त्याचे आशीर्वाद मागत होते आणि त्यांच्या दुःखाचे निवारण होण्यासाठी प्रार्थना करत होते. शिवाय ते “जय हो भैरव नाथ की (Jai Ho Bhairav Nath)!” असा जयघोष करत होते. हा दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुत्रा अशक्त अवस्थेत होता आणि त्याने खाणे-पिणे जवळजवळ बंद केले होते. तो पाणीही पित नव्हता . त्यानंतर प्राणीप्रेमी आणि शिवालया एनिमल वेलनेस संस्थेच्या संचालक संध्या रस्तोगी (Animal welfare activist Sandhya Rastogi) यांनी डॉक्टर संजय महापात्रा (Dr. Sanjay Mahapatra,) यांच्याशी संपर्क साधला.दोघांनीही कुत्र्यावर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे केंद्राची टीम १८ जानेवारीला त्या ठिकाणी पोहोचली.
पशुवैद्यकीय डॉक्टरांनी मंदिरात पोहोचून कुत्र्याची वैद्यकीय तपासणी केली. पाण्याअभावी आणि भुकेमुळे तो अशक्त असल्याचेही सांगण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीत आढळले की, कुत्र्याला मेंदूसंबंधी न्यूरोलॉजिकल (Neurological)आजार आहे. डोक्याला दुखापत झाल्याने मेंदूपर्यंत ऑक्सिजन (oxygen) नीट पोहोचत नाही आणि त्यामुळे कुत्रा अशक्त व असामान्य वर्तन करत होता. कुत्रा भुकेमुळे व पाण्याअभावी अत्यंत कमकुवत झाला होता.
मात्र तेथील नागरिक त्या कुत्र्याला नेऊ देत नव्हते , कुत्रा आजारी आहे हे त्यांना मान्य नव्हते . अनेक दिवस कुत्रा आजारी असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रकृती बिघडल्यावर कुत्र्याला द्रवपदार्थ देण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडे परवानगी मागण्यात आली. ही परवानगी देण्यात आली असली, तरी भाविक मंदिर परिसरात नसतील त्या रात्रीच्या वेळेतच द्रवपदार्थ देण्याचा आग्रह व्यवस्थापनाने धरला. तोपर्यंत कुत्रा इतका अशक्त झाला होता की त्याला नीट उभे राहणेही शक्य नव्हते. अखेर त्याची प्रकृती खालावल्यानंतर मध्यरात्री त्याला गुपचूप उचलून उपचारासाठी नोएडाला हलवण्यात आले.
कुत्र्याला पुढील उपचारांसाठी दिल्लीला नेण्यात आले. नोएडास्थित हाऊस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स या संस्थेचे संस्थापक संजय महापात्रा यांनी सांगितले की, तपासणीत कुत्र्याला मेंदूशी संबंधित समस्या असल्याचे आढळले. ही समस्या गोचीड-जन्य संसर्गामुळे उद्भवली असे रक्त तपासणीत उघड झाले आहे. उपचारानंतर कुत्र्याची प्रकृती सुधारत आहे.
पशुवैद्यकांच्या मते, कुत्र्याचे हे असामान्य वर्तन कोणत्याही धार्मिक भावनेतून नव्हते, तर आजारपणामुळे त्याचा शरीरावरचा ताबा सुटल्याने तो एका जागी गोल फिरत होता. सध्या कुत्रा हळूहळू सामान्य स्थितीकडे जात असून लवकरच त्याला बिजनोरला परत नेण्यात येणार आहे.
हे देखील वाचा –
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीला अंगणवाडी सेविकांचा नकार ; अतिरिक्त कामाचा ताण ; आंदोलनाचे संकेत









