Home / क्रीडा / Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहल पुन्हा चर्चेत! आरजे महवशला अनफॉलो केल्यानंतर ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याने चर्चांना उधाण

Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहल पुन्हा चर्चेत! आरजे महवशला अनफॉलो केल्यानंतर ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याने चर्चांना उधाण

Yuzvendra Chahal and Shefali Bagga : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहल पुन्हा एकदा मैदाबाहेरील आयुष्यामुळे चर्चेत आला...

By: Team Navakal
Yuzvendra Chahal and Shefali Bagga
Social + WhatsApp CTA

Yuzvendra Chahal and Shefali Bagga : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहल पुन्हा एकदा मैदाबाहेरील आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून ‘बिग बॉस’ फेम आणि निवेदिका शेफाली बग्गा हिच्यासोबत बाहेर पडतानाचा चहलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

डिनरनंतर हे दोघेही एकत्र बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाले असून, यामुळे त्यांच्यात नक्की काय सुरू आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

शेफाली बग्गासोबतची ती भेट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चहल आणि शेफाली बग्गा एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान उत्सुक असलेल्या चाहत्यांनी त्यांचे व्हिडिओ बनवले, मात्र दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ही केवळ एक मैत्रीपूर्ण भेट होती की यामागे काही वेगळे कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरजे महवशसोबत ब्रेकअपच्या चर्चा?

या भेटीचे महत्त्व अधिक वाढण्याचे कारण म्हणजे चहल आणि त्याची कथित मैत्रीण आरजे महवश यांच्यातील वाढलेला दुरावा. गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे की, युझवेंद्र चहल आणि आरजे महवश यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

आरजे महवशने एक सूचक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने म्हटले आहे की, “90 टक्के वेळ मी माझे केस ठीक करते, तर उरलेला वेळ माझे आयुष्य सावरण्यात घालवते.” चहलने देखील एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये श्रीकृष्णाचा दाखला देत “प्रत्येक व्यक्तीला स्पष्टीकरण देण्याची गरज नसते, कधीकधी शांत राहणेच उत्तम असते,” असे म्हटले आहे.

खाजगी आयुष्यात सतत चढ-उतार

दरम्यान, युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा 2025 मध्ये अधिकृतपणे घटस्फोट झाला. त्यानंतर चहलचे नाव आरजे महवशसोबत जोडले गेले होते. चहलने यापूर्वी महवशसोबत कोणतेही नाते असल्याचे नाकारले होते, मात्र आता त्यांना अनफॉलो करून शेफाली बग्गासोबत दिसल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या