Home / देश-विदेश / LR-AShM Missile: शत्रूच्या युद्धनौका आता सुरक्षित नाहीत! DRDO ने बनवले 1500 किमी पल्ल्याचे आधुनिक क्षेपणास्त्र

LR-AShM Missile: शत्रूच्या युद्धनौका आता सुरक्षित नाहीत! DRDO ने बनवले 1500 किमी पल्ल्याचे आधुनिक क्षेपणास्त्र

LR-AShM Missile: नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन संचलनात भारताने आपल्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाचे दर्शन घडवले. यावेळी...

By: Team Navakal
LR-AShM Missile
Social + WhatsApp CTA

LR-AShM Missile: नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन संचलनात भारताने आपल्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाचे दर्शन घडवले. यावेळी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले ‘एलआर-एएसएचएम’ (LR-AShM) हे लांब पल्ल्याचे जहाजविरोधी हायपरसोनिक क्षेपणास्त्र पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आले. हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाची समुद्रातील सुरक्षा आणि आक्रमण क्षमता अधिक मजबूत करणार आहे.

काय आहे ‘LR-AShM’ क्षेपणास्त्र?

हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र आहे. समुद्रातील स्थिर आणि हलत्या लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.

  • वेग: हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा १० पट जास्त (मॅक १०) वेगाने झेप घेऊ शकते आणि सरासरी ५ पट (मॅक ५) वेगाने प्रवास करते. साधारण ६,००० किमी प्रति तास असा हा वेग असल्याने शत्रूला सावरायला वेळच मिळत नाही.
  • रेंज: सध्याच्या आवृत्तीची क्षमता १,५०० किमी असून भविष्यात ही रेंज ३,५०० किमीपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे १५०० किमीचे अंतर हे क्षेपणास्त्र अवघ्या १५ मिनिटांत कापू शकते.

हे क्षेपणास्त्र कसे काम करते?

हे क्षेपणास्त्र दोन टप्प्यांत काम करते. पहिल्या टप्प्यात इंजिन याला प्रचंड वेग देते आणि त्यानंतर हे क्षेपणास्त्र वातावरणात ‘ग्लाइड’ करत पुढे जाते. हवेत तरंगत असताना हे आपली दिशा बदलू शकते, ज्यामुळे शत्रूच्या रडार यंत्रणेला याला शोधणे किंवा हवेतच पाडणे अशक्यप्राय होते. नौदलाच्या कोणत्याही वर्गातील युद्धनौका उद्ध्वस्त करण्याची क्षमता यात आहे.

संरक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड

डीआरडीओच्या मते, हे क्षेपणास्त्र ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेतंर्गत विकसित करण्यात आलेले सर्वात प्रगत शस्त्र आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात या क्षेपणास्त्रासोबतच अर्जुन रणगाडा, ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि आकाश एअर डिफेन्स सिस्टमचेही दर्शन घडले. तसेच लाल किल्ल्यावर होणाऱ्या ‘भारत पर्व’ कार्यक्रमात नौदलाचे आधुनिक टॉर्पेडो आणि आयसीएस प्रणाली देखील प्रदर्शित केली जाणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या