Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : वैचारिक मतभेद विसरून महेश लांडगेंकडून अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

Ajit Pawar : वैचारिक मतभेद विसरून महेश लांडगेंकडून अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

Ajit Pawar : पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर यापूर्वी राजकीय आरोप करणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र...

By: Team Navakal
Ajit Pawar Plane Crash
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar : पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर यापूर्वी राजकीय आरोप करणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अजित पवारांविरोधात आक्रमक प्रचार करणारे महेश लांडगे यांनी, वैचारिक मतभेद बाजूला ठेवत, पवार यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी ‘एक्स’वर भावनिक पोस्ट करत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महेश लांडगे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले,

“अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादांसारखा धडाडीचा, निर्णयक्षम आणि प्रचंड कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपले आहे.”
ते पुढे म्हणाले,“जनतेच्या प्रश्नांसाठी पहाटे सहा वाजेपासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. दादांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबीयांसह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना करतो.”

राजकीय मतभेद असूनही महेश लांडगे यांनी व्यक्त केलेल्या या भावनांमुळे, अजित पवार यांच्या नेतृत्वाचा ठसा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन किती खोलवर होता, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या