Home / देश-विदेश / Surya Grahan 2026 : सूर्याभोवती लाल वलय; २०२६ मधील पहिले सूर्यग्रहण ठरणार वैशिष्ट्यपूर्ण

Surya Grahan 2026 : सूर्याभोवती लाल वलय; २०२६ मधील पहिले सूर्यग्रहण ठरणार वैशिष्ट्यपूर्ण

Surya Grahan 2026 : २०२६ सालातील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी लागणार असून, हे ग्रहण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या...

By: Team Navakal
Surya Grahan 2026
Social + WhatsApp CTA

Surya Grahan 2026 : २०२६ सालातील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी लागणार असून, हे ग्रहण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या वेळी दिवसा सूर्य पूर्णपणे काळा दिसेल आणि केवळ कडेच्या भागातून लालसर प्रकाश दिसणार असल्याने हा अनुभव दुर्मिळ आणि नेत्रदीपक असणार आहे.

सूर्यग्रहणाच्या काळात काही क्षणांसाठी परिसरात अंधारासारखी स्थिती निर्माण होईल. सूर्याचा मध्यभाग काळा दिसेल, तर केवळ कडेला प्रकाशाची वलयाकृती रेषा जाणवेल. काही सेकंद ही स्थिती कायम राहिल्यानंतर सूर्य पुन्हा आपल्या नेहमीच्या स्वरूपात प्रकाशमान होईल.

हे सूर्यग्रहण अल्पकालीन असले तरी त्या काही क्षणांत अनेक वेगळे अनुभव घेता येणार आहेत. सूर्याचा प्रकाश कसा कमी होतो आणि पुन्हा पूर्ववत कसा येतो, याबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

या सूर्यग्रहणाबाबत भारतातही मोठी उत्सुकता पाहायला मिळत असली, तरी हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, अर्जेंटिना आणि चिली या भागांमध्येच दृश्यमान होणार आहे. मात्र, या दुर्मिळ सूर्यग्रहणाचे फोटो आणि व्हिडीओ जगभरात पाहायला मिळणार आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या