Home / arthmitra / New Rules February 2026: उद्यापासून खिसा सांभाळा! 1 फेब्रुवारीपासून ‘हे’ 5 मोठे बदल होणार

New Rules February 2026: उद्यापासून खिसा सांभाळा! 1 फेब्रुवारीपासून ‘हे’ 5 मोठे बदल होणार

New Rules February 2026: फेब्रुवारी महिन्याची सुरुवात सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून...

By: Team Navakal
New Rules February 2026
Social + WhatsApp CTA

New Rules February 2026: फेब्रुवारी महिन्याची सुरुवात सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून करप्रणालीपासून ते गॅस सिलिंडरच्या दरापर्यंत अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत.

या बदलांचा थेट परिणाम तुमच्या घरखर्चावर आणि गुंतवणुकीवर होणार आहे. उद्यापासून नेमके काय बदल होणार आहेत, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. निर्मला सीतारामन मांडणार नववा अर्थसंकल्प

उद्या, १ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. सलग नवव्यांदा बजेट मांडून त्या नवा विक्रम करणार आहेत. सध्या नवीन करप्रणालीनुसार 12.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे, मात्र या मर्यादेत वाढ होणार का, याकडे नोकरदार वर्गाचे लक्ष लागले आहे.

२. फास्टॅग केवायसी (FASTag) नियमात मोठा दिलासा

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून फास्टॅगसाठीची अतिरिक्त केवायसी प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आता फास्टॅग सक्रिय केल्यानंतर वेगळ्या केवायसीची गरज भासणार नाही. संबंधित बँकाच आता वाहनांच्या माहितीची पडताळणी करण्याची पूर्ण जबाबदारी घेतील.

३. गॅस सिलिंडर आणि इंधनाचे नवीन दर

दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर जाहीर करतात. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 14.50 रुपयांनी कमी झाले होते. उद्या जाहीर होणाऱ्या नवीन दरांमुळे गृहिणींचे बजेट सुधारेल की बिघडेल, हे स्पष्ट होईल. सोबतच सीएनजी, पीएनजी आणि विमान इंधनाच्या (ATF) दरातही बदलाची शक्यता आहे.

४. शेअर बाजार रविवारीही राहणार सुरू

साधारणपणे रविवारी शेअर बाजार बंद असतो, पण बजेटमुळे उद्या १ फेब्रुवारी रोजी ‘NSE’ आणि ‘BSE’ पूर्णवेळ सुरू राहतील. सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 या वेळेत व्यवहार होतील. अर्थसंकल्पातील घोषणांमुळे बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळू शकते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

५. तंबाखू, सिगारेट आणि पान मसाला महागणार

व्यसनाधीन वस्तूंवर सरकार कर वाढवण्याच्या तयारीत आहे. १ फेब्रुवारीपासून सिगारेट, तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या उत्पादनांवर जीएसटी, उत्पादन शुल्क आणि उपकर वाढण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली या वस्तूंवर अतिरिक्त कर लादला जाऊ शकतो, ज्यामुळे या वस्तूंच्या किमती वाढतील.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या