Home / क्रीडा / T20 World Cup 2026: टी२० विश्वचषकाचा थरार 7 फेब्रुवारीपासून! भारत-श्रीलंकेत रंगणार 54 सामने; पाहा पूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2026: टी२० विश्वचषकाचा थरार 7 फेब्रुवारीपासून! भारत-श्रीलंकेत रंगणार 54 सामने; पाहा पूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2026 Full Schedule: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर...

By: Team Navakal
T20 World Cup 2026
Social + WhatsApp CTA

T20 World Cup 2026 Full Schedule: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली या स्पर्धेला सुरुवात होईल. एकूण १० व्या आवृत्तीत २० संघ सहभागी होणार असून १ महिन्याच्या कालावधीत ५४ सामने खेळवले जातील.

सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास नकार दिल्याने बांगलादेशला स्पर्धेतून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी मिळाली आहे.

गट विभागणी (Groups)

  • गट A: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया.
  • गट B: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान.
  • गट C: इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ, स्कॉटलंड, इटली.
  • गट D: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा.

स्पर्धेचे स्वरूप (Format)

स्पर्धेची विभागणी तीन टप्प्यांत करण्यात आली आहे. सुरुवातीला ‘गट फेरी’ होईल, जिथून प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ ‘सुपर 8’ मध्ये जातील. त्यानंतर ४-४ संघांचे दोन गट केले जातील. सुपर 8 मधील सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. ८ मार्च रोजी स्पर्धेचा महाअंतिम सामना पार पडेल.

टी२० विश्वचषक २०२६: संपूर्ण वेळापत्रक (गट फेरी)

तारीखसामनावेळ (IST)मैदान
७ फेब्रुवारीनेदरलँड वि. पाकिस्तानसकाळी 11:00एसएससी, कोलंबो
७ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. वेस्ट इंडीजदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता
७ फेब्रुवारीभारत वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई
८ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. न्यूझीलंडसकाळी 11:00चिदंबरम, चेन्नई
८ फेब्रुवारीइंग्लंड वि. नेपाळदुपारी 3:00वानखेडे, मुंबई
८ फेब्रुवारीश्रीलंका वि. आयर्लंडसंध्याकाळी 7:00प्रेमदासा, कोलंबो
९ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. इटलीसकाळी 11:00ईडन गार्डन्स, कोलकाता
९ फेब्रुवारीओमान वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00एसएससी, कोलंबो
९ फेब्रुवारीकॅनडा वि. दक्षिण आफ्रिकासंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१० फेब्रुवारीनामिबिया वि. नेदरलँडसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली
१० फेब्रुवारीन्यूझीलंड वि. युएईदुपारी 3:00चिदंबरम, चेन्नई
१० फेब्रुवारीपाकिस्तान वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00एसएससी, कोलंबो
११ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिकासकाळी 11:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद
११ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. आयर्लंडदुपारी 3:00प्रेमदासा, कोलंबो
११ फेब्रुवारीइंग्लंड वि. वेस्ट इंडीजसंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई
१२ फेब्रुवारीश्रीलंका वि. ओमानसकाळी 11:00पल्लेकेले, कॅन्डी
१२ फेब्रुवारीइटली वि. नेपाळदुपारी 3:00वानखेडे, मुंबई
१२ फेब्रुवारीभारत वि. नामिबियासंध्याकाळी 7:00अरुण जेटली, दिल्ली
१३ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वेसकाळी 11:00प्रेमदासा, कोलंबो
१३ फेब्रुवारीकॅनडा वि. युएईदुपारी 3:00अरुण जेटली, दिल्ली
१३ फेब्रुवारीनेदरलँड वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00चिदंबरम, चेन्नई
१४ फेब्रुवारीआयर्लंड वि. ओमानसकाळी 11:00एसएससी, कोलंबो
१४ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. इंग्लंडदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता
१४ फेब्रुवारीन्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिकासंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१५ फेब्रुवारीनेपाळ वि. वेस्ट इंडीजसकाळी 11:00वानखेडे, मुंबई
१५ फेब्रुवारीनामिबिया वि. अमेरिकादुपारी 3:00चिदंबरम, चेन्नई
१५ फेब्रुवारीभारत वि. पाकिस्तानसंध्याकाळी 7:00प्रेमदासा, कोलंबो
१६ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. युएईसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली
१६ फेब्रुवारीइंग्लंड वि. इटलीदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता
१६ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. श्रीलंकासंध्याकाळी 7:00पल्लेकेले, कॅन्डी
१७ फेब्रुवारीकॅनडा वि. न्यूझीलंडसकाळी 11:00चिदंबरम, चेन्नई
१७ फेब्रुवारीआयर्लंड वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00पल्लेकेले, कॅन्डी
१७ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. नेपाळसंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई
१८ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिका वि. युएईसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली
१८ फेब्रुवारीनामिबिया वि. पाकिस्तानदुपारी 3:00एसएससी, कोलंबो
१८ फेब्रुवारीभारत वि. नेदरलँडसंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१९ फेब्रुवारीइटली वि. वेस्ट इंडीजसकाळी 11:00ईडन गार्डन्स, कोलकाता
१९ फेब्रुवारीश्रीलंका वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00प्रेमदासा, कोलंबो
१९ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. कॅनडासंध्याकाळी 7:00चिदंबरम, चेन्नई
२० फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. ओमानसंध्याकाळी 7:00पल्लेकेले, कॅन्डी

बाद फेरी (Knockouts)

  • 21 फेब्रुवारीपासून सुपर-8 चे सामने सुरु होतील.
  • पहिली उपांत्य फेरी: ४ मार्च (कोलंबो किंवा कोलकाता)
  • दुसरी उपांत्य फेरी: ५ मार्च (मुंबई) – जर भारत पात्र झाला तर हा सामना वानखेडेवर होईल.
  • महाअंतिम सामना: ८ मार्च (अहमदाबाद किंवा कोलंबो)
Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या