Home / महाराष्ट्र / Malegaon News : मालेगावात काँग्रेस नगरसेवकावर पक्षशिस्तभंगाची कारवाई

Malegaon News : मालेगावात काँग्रेस नगरसेवकावर पक्षशिस्तभंगाची कारवाई

Malegaon News : मालेगाव महापालिकेत दोन दिवसांपूर्वी भाजपचे दोन आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक एकत्र येत भारत विकास आघाडीची स्थापना करण्यात...

By: Team Navakal
Malegaon News
Social + WhatsApp CTA

Malegaon News : मालेगाव महापालिकेत दोन दिवसांपूर्वी भाजपचे दोन आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक एकत्र येत भारत विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. याची नोंदही आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र अवघ्या दोन दिवसांतच या आघाडीत मतभेद निर्माण झाले आणि संबंधित नगरसेवकांनी परस्परांशी औपचारिक फारकत घेतली.

या घडामोडींची काँग्रेस पक्षाने गंभीर दखल घेत पक्षशिस्तभंगाच्या आरोपावरून काँग्रेसचे नगरसेवक एजाज बेग उर्फ अजिज बेग यांच्यावर कारवाई केली आहे.
मालेगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन न करणे आणि पक्षशिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत एजाज बेग यांची मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत त्यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जारी केले आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून एजाज बेग यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मालेगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र एजाज बेग यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

भाजप आणि काँग्रेस या विचारसरणीने परस्परविरोधी पक्ष मानले जात असले तरी स्थानिक राजकारणात ‘विकास’ या मुद्द्यावर राज्यातील काही भागांत काँग्रेस-भाजप, भाजप-एमआयएम अशा आघाड्यांचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. टीकेनंतर अशा आघाड्यांपासून पक्षांनी माघार घेत कारवाई केल्याचेही दिसून आले आहे. मालेगावातील ही घटना त्याच पार्श्वभूमीवर चर्चेत आली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या