Home / महाराष्ट्र / Sunetra Pawar : मंत्रालयातील ‘त्या’ दालनावर आता सुनेत्रा पवारांची पाटी! उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच कामाचा धडाका सुरू

Sunetra Pawar : मंत्रालयातील ‘त्या’ दालनावर आता सुनेत्रा पवारांची पाटी! उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच कामाचा धडाका सुरू

Sunetra Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर शोककळा...

By: Team Navakal
Sunetra Pawar
Social + WhatsApp CTA

Sunetra Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर शोककळा पसरली असतानाच, राजकीय स्थिरता राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर एका मोठ्या बदलाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली; ती म्हणजे अजित पवारांच्या दालनाबाहेर लागलेली सुनेत्रा पवार यांच्या नावाची ‘पाटी’.

सहाव्या मजल्यावर बदलाचे वारे

मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्याला विशेष महत्त्व आहे, कारण याच ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दालने आहेत. याच मजल्यावर असलेल्या ६०२ क्रमांकाच्या दालनावर गेल्या अनेक काळापासून ‘अजित पवार’ यांच्या नावाची पाटी झळकत होती. आज मात्र या पाटीची जागा सुनेत्रा पवार यांच्या नावाने घेतली आहे. ही केवळ एक नावाची पाटी नसून राज्याच्या सत्तेतील एका नव्या पर्वाची ती सुरुवात मानली जात आहे.

सुनेत्रा पवारांवर जबाबदाऱ्यांचा वर्षाव

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदारीतही सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या खालील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत:

  1. महत्त्वाची खाती: राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती त्यांच्याकडे देण्यात आली आहेत.
  2. पालकमंत्री पद: अजित पवारांकडे असलेल्या पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पदही आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत.

तटकरेंनी दिले ‘घाई’च्या प्रश्नाला उत्तर

सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीत इतकी घाई का करण्यात आली? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “विधीमंडळ नेता निवडणे हा आमचा अधिकार आहे. दादांची इच्छा काय होती आणि सरकार स्थिर राहणे किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांना ठाऊक आहे.”

पहिली भेट सुरक्षारक्षकाच्या कुटुंबाची

पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी मानुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी सर्वात आधी अजित पवारांसोबत अपघातात मृत्यूमुखी पडलेले सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीचे सांत्वन केले. केवळ आश्वासन न देता त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे वचनही त्यांनी यावेळी दिले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या