Home / महाराष्ट्र / Mumbai Mayor Election: मुंबईचा पुढचा ‘प्रथम नागरिक’ कोण? महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ११ फेब्रुवारीला रंगणार निवडणुकीचा थरार

Mumbai Mayor Election: मुंबईचा पुढचा ‘प्रथम नागरिक’ कोण? महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ११ फेब्रुवारीला रंगणार निवडणुकीचा थरार

: मुंबई महानगरपालिकेचा गड कोणी सर केला, याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ‘मुंबईचा महापौर’ कोण होणार, याकडे लागले...

By: Team Navakal
Mumbai Mayor Election
Social + WhatsApp CTA

: मुंबई महानगरपालिकेचा गड कोणी सर केला, याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ‘मुंबईचा महापौर’ कोण होणार, याकडे लागले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईच्या नव्या महापौराची निवड होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

महापालिका निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटल्यानंतर अखेर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीचा अधिकृत मार्ग मोकळा झाला आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौर निवडीची प्रक्रिया खालीलप्रमाणे पार पडेल:

  • 7 फेब्रुवारी: महापौरपदासाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल.
  • 11 फेब्रुवारी: मुंबई महापालिकेच्या मुख्य सभागृहात दुपारी 12 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच सभेत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
  • निकालाची घोषणा: 11 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्याच दिवशी मुंबईच्या नवीन महापौराच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल.

राजकीय समीकरणे आणि संभाव्य उमेदवार

2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, मात्र 227 सदस्यीय सभागृहात 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदा महापौराची खुर्ची ‘खुली प्रवर्ग – महिला’ साठी राखीव असल्याने भाजपकडून काही नावे चर्चेत आहेत. यात माहिम-दादरमधून विजयी झालेल्या शीतल गंभीर देसाई आणि घाटकोपरमधील अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांची नावे आघाडीवर आहेत.

शिंदे गटाची भूमिका आणि ‘हॉटेल पॉलिटिक्स’

निवडणुकीचा निकाल लागताच संख्याबळ सुरक्षित ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले होते. मुंबईवर आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी शिंदे गटाने महापौरपदासाठी सुरुवातीला आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या सविस्तर चर्चेनंतर महायुतीचा ‘पॉवर शेअरिंग’ फॉर्म्युला ठरल्याचे समजते. यानुसार भाजपला महापौरपद, तर शिंदे गटाला उपमहापौर आणि काही महत्त्वाच्या समित्यांची पदे मिळण्याची शक्यता आहे.

७ फेब्रुवारीपासून अर्जांची छाननी सुरू होणार असल्याने, आता अवघ्या काही दिवसांत मुंबईला नवीन महिला महापौर मिळणार, हे निश्चित झाले आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या