Home / लेख / T20 World Cup : वर्ल्ड कप पाहण्यासाठी आता सबस्क्रिप्शनची गरज नाही! ‘या’ रिचार्जवर जिओ-हॉटस्टार मिळतेय अगदी मोफत

T20 World Cup : वर्ल्ड कप पाहण्यासाठी आता सबस्क्रिप्शनची गरज नाही! ‘या’ रिचार्जवर जिओ-हॉटस्टार मिळतेय अगदी मोफत

T20 World Cup : टी२० वर्ल्ड कपचा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे....

By: Team Navakal
T20 World Cup
Social + WhatsApp CTA

T20 World Cup : टी२० वर्ल्ड कपचा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. हे सामने डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जिओ-हॉटस्टार’वर पाहता येतील. विशेष म्हणजे, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी काही खास रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅन्ससह युजर्सना जिओ-हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे, ज्यामुळे वेगळे पैसे न भरता वर्ल्ड कपचे सामने लाईव्ह पाहता येतील.

रिलायन्स जिओचे (Jio) स्वस्त प्लॅन्स

  • 100 रुपयांचा प्लॅन: हा खास क्रिकेट डेटा पॅक असून यामध्ये 30 दिवसांसाठी 5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. मुख्य म्हणजे, यात 30 दिवसांचे जिओ-हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.
  • 195 रुपयांचा प्लॅन: ज्यांना जास्त डेटा हवा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात 15GB डेटासह 90 दिवसांची वैधता आणि 90 दिवसांचे जिओ-हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते.

व्होडाफोन-आयडियाचे (Vi) प्लॅन्स

  • 44 रुपयांचा प्लॅन: हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. यात 1GB डेटा फक्त एका दिवसासाठी मिळतो, मात्र जिओ-हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन पूर्ण 30 दिवसांसाठी वैध राहते.
  • 101 रुपयांचा प्लॅन: यामध्ये 5GB डेटासह 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
  • 151 आणि 169 रुपयांचे प्लॅन: या दोन्ही प्लॅन्समध्ये 90 दिवसांची वैधता आणि 3 महिन्यांचे जिओ-हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते. 169 रुपयांच्या प्लॅनमध्ये 8GB डेटा मिळत असल्याने उत्तम दर्जाची स्ट्रीमिंग शक्य होते.

एअरटेलचे (Airtel) धमाकेदार प्लॅन्स

  • 100 रुपयांचा प्लॅन: एअरटेलच्या या डेटा पॅकमध्ये 30 दिवसांसाठी 6GB डेटा आणि 1 महिन्याचे जिओ-हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते.
  • 195 रुपयांचा प्लॅन: यामध्ये 12GB डेटासह 30 दिवसांची वैधता मिळते. सोबतच जिओ-हॉटस्टार आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचा अतिरिक्त फायदाही युजर्सना मिळतो.

महत्त्वाची टीप: हे सर्व प्लॅन्स ‘डेटा ॲड-ऑन’ किंवा ‘डेटा वाउचर’ प्रकारातील आहेत. याचा वापर करण्यासाठी तुमच्या सिम कार्डवर कोणताही एक कॉलिंगचा बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या