Home / महाराष्ट्र / Mumbai News : मुंबई महापालिकेच्या सभागृहात मोठा गोंधळ; काँग्रेस नगरसेवक झाले आक्रमक.. थेट घेतली महापौरांच्या आसनाकडे धाव; सभागृहात तणाव

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या सभागृहात मोठा गोंधळ; काँग्रेस नगरसेवक झाले आक्रमक.. थेट घेतली महापौरांच्या आसनाकडे धाव; सभागृहात तणाव

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभागृहात आज शाळा दत्तक धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र खडाजंगी पाहायला मिळाली. काँग्रेसचे नगरसेवक...

By: Team Navakal
Mumbai News
Social + WhatsApp CTA

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभागृहात आज शाळा दत्तक धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र खडाजंगी पाहायला मिळाली. काँग्रेसचे नगरसेवक हैदर अली शेख यांनी मांडलेल्या एका प्रस्तावामुळे सभागृहातील वातावरण कमालीचे तापले होते. या चर्चेदरम्यान भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले होते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मात्र या सर्व वादापासून अलिप्त असल्याचे दिसून आले.

काँग्रेस नगरसेवक हैदर अली शेख यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी एक ठरावाची सूचना सादर केली होती. यामध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या शाळा खासगी संस्था किंवा स्वयंसेवी संस्थांना (NGO) दत्तक देण्याचे धोरण तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. शेख यांच्या मते, २००७ पासून राबवल्या जाणाऱ्या या धोरणामुळे अनेक गंभीर त्रुटी निर्माण झाल्या आहेत. प्रामुख्याने, दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये काही संस्थांकडून ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. केंद्र सरकारच्या शैक्षणिक नियमांनुसार प्राथमिक स्तरावर टीईटी उत्तीर्ण शिक्षक असणे अनिवार्य असताना, अशा नियुक्त्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रस्तावात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. महानगरपालिकेने अलीकडच्या काळात आयसीएसई (ICSE), सीबीएसई (CBSE), आयबी (IB) आणि केंब्रिज आयजीसीएसई (IGCSE) यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळांच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांना पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेला स्वतःच्या शाळा चालवण्यासाठी इमारतींची कमतरता भासत असताना, खासगी संस्थांना शाळांच्या इमारती दत्तक देणे चुकीचे असल्याचे शेख यांनी म्हटले. त्यामुळे हे धोरण रद्द करून यासंदर्भात आयुक्तांनी सविस्तर अहवाल सादर करावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली.

या सूचनेवर चर्चा सुरू असताना सत्ताधारी नगरसेवक आणि काँग्रेसचे सदस्य यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, ज्याचे रूपांतर नंतर मोठ्या गोंधळात झाले. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी आक्रमक होत महापौरांच्या आसनाकडे धाव घेतल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला. या बेशिस्त वर्तनावर सभागृह नेते गणेश कणखर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सभागृहाची एक प्रतिष्ठा आणि परंपरा आहे, अशा प्रकारे गोंधळ घालून लोकशाहीच्या मंदिराचा अवमान करणे अयोग्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या