Google Pixel 10 Flipkart Sasa Lele Sale : स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर येत्या ३ दिवसांत ‘Sasa Lele’ सेल सुरू होत आहे. ९ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये Google, Samsung आणि Apple सारख्या दिग्गज ब्रँड्सच्या प्रीमियम फोन्सवर मोठी सवलत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, रॅमच्या (RAM) तुटवड्यामुळे कंपन्यांनी मोबाईलच्या किमती वाढवल्या असताना, या सेलमध्ये तुम्हाला स्वस्तात फोन घेता येईल.
Google Pixel 10 वर मिळवा मोठी बचत
फ्लिपकार्टने सेल सुरू होण्यापूर्वीच Google Pixel 10 वरील ऑफर्सचा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ७९,९९९ रुपयांना लाँच झालेला हा फोन या सेलमध्ये तुम्ही चक्क ५९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच या फोनवर तुम्हाला २०,००० रुपयांपर्यंत थेट बचत करण्याची संधी आहे. ही किंमत बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनससह असू शकते, ज्याचा सविस्तर तपशील सेल सुरू झाल्यावर स्पष्ट होईल.
बँक ऑफर्सचा अतिरिक्त फायदा
केवळ किमतीत कपात नाही, तर फ्लिपकार्ट अतिरिक्त बँक ऑफर्सही देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. ही सवलत ईएमआय (EMI) व्यवहारांवरही लागू असेल.
का खास आहे Google Pixel 10?
जर तुम्ही प्रीमियम लूक आणि जबरदस्त परफॉर्मन्स असलेला फोन शोधत असाल, तर पिक्सेल १० हा एक उत्तम पर्याय आहे:
- डिस्प्ले: यात ३००० निट्स पीक ब्राइटनेस असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे.
- परफॉर्मन्स: दैनंदिन वापरामध्ये हा फोन कुठेही लॅग होत नाही. यामध्ये ‘Gemini Nano’ हे एआय मॉडेल ऑन-डिवाईस काम करते.
- गेमिंग: कॉल ऑफ ड्युटीसारखे गेम्स हा फोन सहज हाताळू शकतो.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड सेन्सर आहे, जो दिवसाच्या उजेडात उत्कृष्ट फोटो क्लिक करतो.
- साऊंड: यातील स्टिरिओ स्पीकर्सचा आवाज इतका मोठा आहे की तो लहान खोलीत सहज घुमतो.
हे देखील वाचा – Smartphones Sale: ऑनलाइन सेलमध्ये स्वस्त फोन घेताना फसवणूक टाळायचीय? मग ‘या’ 5 गोष्टी कधीच विसरू नका











