Tata Punch EV Discount: भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा निर्माण करणारी कंपनी टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी एक खळबळजनक ऑफर आणली आहे. जून 2026 या महिन्यामध्ये कंपनी आपल्या वेगवेगळ्या गाड्यांवर प्रचंड सवलत देत आहे.
यामध्ये सर्वात जास्त आकर्षण ठरत आहे ते कंपनीची सर्वाधिक पसंती मिळवणारी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘टाटा पंच इलेक्ट्रीक’. या सेल दरम्यान जर तुम्ही ही कार खरेदी केली, तर तुम्हाला तब्बल 1.45 लाख रुपयांपर्यंतचा थेट आर्थिक फायदा मिळू शकतो. या ऑफरमध्ये रोख सवलतीसह इतर अनेक फायद्यांचा समावेश आहे.
Tata Punch EV Discount: पेट्रोल मॉडेलपेक्षा किती वेगळा आहे लुक?
टाटा पंच इलेक्ट्रीक दिसायला तिच्या जुन्या पेट्रोल मॉडेलपेक्षा जास्त आधुनिक आणि आकर्षक वाटते:
- प्रिमियम फ्रंट लुक: कारच्या पुढच्या भागात दिलेली कनेक्टेड एलईडी लाईट बार आणि बंद ग्रिल या गाडीला एक नवीन पिढीतील प्रिमियम लुक देतात.
- चार्जिंग सुविदा: विशेष म्हणजे या गाडीचा चार्जिंग पॉईंट कंपनीने पुढच्या बंपरमध्येच दिला आहे.
- आधुनिक केबिन: कारच्या आत ग्राहकांसाठी 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन आणि संपूर्ण डिजिटल मीटर देण्यात आले आहे. याशिवाय उन्हाळ्यात आराम देणाऱ्या वेंटिलेटेड सीट्स, सनरूफ आणि वायरलेस चार्जर यांसारखे प्रिमियम फीचर्स यात मिळतात.
Tata Punch EV Discount: सिंगल चार्जमध्ये ४०० किलोमीटरपेक्षा जास्त धावणार
टाटा कंपनीने ही कार ग्राहकांच्या गरजेनुसार दोन वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांसह बाजारात आणली आहे:
- स्टँडर्ड मॉडेल: यात 25 kWh क्षमतेची बॅटरी मिळते. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे 315 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करू शकते.
- लॉन्ग रेंज मॉडेल: ज्यांना लांबचा प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी 35 kWh चा मोठा बॅटरी पॅक दिला आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 421 किलोमीटरची शानदार रेंज देते.
ही कार वेग पकडण्यातही खूप भारी आहे. अवघ्या 9.5 सेकंदात ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रतितास असा वेग पकडू शकते. तसेच फास्ट चार्जरच्या मदतीने ही गाडी केवळ 56 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
Tata Punch EV Discount: सुरक्षेच्या बाबतीत ५-स्टार रेटिंग अन् बजेटमध्ये फिट
सुरक्षेच्या नियमांचा विचार केला तर ही कार देशातील सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक मानली जाते. भारत एनसीएपी (BNCAP) क्रैश टेस्टमध्ये या कारला प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
कंपनीने या कारच्या सर्वच मॉडेल्समध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि चारही चाकांना डिस्क ब्रेक यांसारखे कडक फीचर्स दिले आहेत. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 9.69 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेलसाठी 12.69 लाख रुपयांपर्यंत जाते. या डिस्काउंट ऑफरची अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी ग्राहक आपल्या जवळच्या टाटा डीलरशिपशी संपर्क साधू शकतात.
हे देखील वाचा – CJP Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे आंदोलन; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कार्यकर्त्यांना नियमावली










