Home / महाराष्ट्र / Ketan Agarwal Pune Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Ketan Agarwal Pune Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Ketan Agarwal Pune Case: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या २२ वर्षीय तरुण केतन अग्रवाल याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचे...

By: Team Navakal
Ketan Agarwal Pune Case: पुणे केतन अग्रवाल हत्याकांडात मोठा ट्विस्ट! प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
Social + WhatsApp CTA

Ketan Agarwal Pune Case: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या २२ वर्षीय तरुण केतन अग्रवाल याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची भीषणता आणि संवेदनशीलता पाहता राज्य सरकारने या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर) म्हणून नियुक्ती केली आहे.

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासह अनेक हाय-प्रोफाईल खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडणारे उज्ज्वल निकम आता केतनला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात लढणार आहेत.

यापूर्वी, मृत केतन अग्रवाल यांच्या वडिलांनी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. आपल्या मुलाच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणिउज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मागण्यांना तात्काळ मंजुरी दिली आहे.

“संपूर्ण देश हादरला…”; जबाबदारी स्वीकारल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या प्रकरणाबाबत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:

  • मुख्यमंत्र्यांचा फोन: “दुपारच्या सुमारास मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. अग्रवाल कुटुंबियांनी त्यांची भेट घेऊन माझी नियुक्ती करण्याची मागणी केल्याचे त्यांनी मला सांगितले. पीडित कुटुंब आणि मुख्यमंत्र्यांच्या विनंतीचा मान राखून मी ही जबाबदारी स्वीकारली आहे.”
  • कायद्याचे राज्य टिकवणार: “या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य टिकून राहिले पाहिजे आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, याच भावनेने मी मुख्यमंत्र्यांना होकार दिला.”
  • चार्जशीटनंतर सत्य समोर येणार: “सध्या पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल झाल्यानंतरच या तपासाची नेमकी स्थिती आणि सविस्तर माहिती समोर आणणे योग्य ठरेल.”

लोहगड किल्ल्यावरील ‘ते’ हत्याकांड नक्की काय आहे?

पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय होता, मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर हे एक पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे समोर आले:

  • किल्ल्यावरून ढकलल्याचा आरोप: २२ वर्षांचा केतन अग्रवाल हा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून खाली पडला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
  • फियान्से आणि तिच्या प्रियकराला अटक: पोलिसांनी या प्रकरणात केतनची होणारी पत्नी (फियान्से) सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे.
  • बिल्डर आणि कट कारस्थान: या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्यासाठी लोहगड किल्ल्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. सध्या हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

राज्य सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता केतनच्या कुटुंबाला लवकरात लवकर आणि कठोर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या