EPFO Rules: नोकरदार वर्गासाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) फंड काढण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
हे नवे नियम 13 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम ईपीएफ (EPF) म्हणजेच भविष्य निर्वाह निधी आणि ईपीएस (EPS) म्हणजेच पेन्शन फंडाच्या विड्रॉवलवर होणार आहे.
हे बदल प्रक्रिया सुलभ करतील आणि ईपीएस ची दीर्घकाळ सुरक्षा सुनिश्चित करतील, असा दावा EPFO ने केला आहे.
EPFO Rules: ईपीएस काढण्यासाठी आता 36 महिन्यांची अट
ईपीएफओने ईपीएस मधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली किंवा तो बेरोजगार झाला, तर त्याला ईपीएस फंडातून पैसे काढण्यासाठी 36 महिने (म्हणजे 3 वर्षे) पूर्ण करणे बंधनकारक असेल.
यापूर्वी ही अट केवळ 2 महिन्यांची होती, ज्यामुळे नोकरी गमावल्यास अनेकजण पेन्शनची रक्कम काढून घेत होते. या नवीन नियमामागील उद्देश सदस्यांना दीर्घकाळ योजनेत टिकवून ठेवणे आणि पेन्शनच्या रूपात दीर्घकालीन लाभ मिळण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
EPFO Rules: ईपीएसशी संबंधित 5 मोठे बदल
किमान पेन्शन वाढवण्याची तयारी: सध्या ईपीएस-95 अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन 1,000 रुपये आहे, जी सुमारे 11 वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. आता कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने ही रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पेन्शन पेमेंट प्रणाली पूर्णपणे डिजिटल: ईपीएस धारकांसाठी EPFO ने सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) सुरू केली आहे. यामुळे पेन्शनधारक PPO (पेन्शन पेमेंट ऑर्डर) कुठेही जारी झाला असला तरी, कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन घेऊ शकतील. यामुळे पैसे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया संपुष्टात येऊन, पेन्शन पेमेंट जलद आणि पारदर्शक होईल.
उच्च वेतनावर पेन्शनचा अधिकार: न्यायालयाच्या अलीकडील निर्णयांच्या अनुषंगाने, EPFO ने स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष (जास्त) वेतनाच्या आधारावर ईपीएसमध्ये योगदान दिले आहे आणि त्यांचे योगदान स्वीकारले गेले आहे, ते आता जास्त पेन्शन मिळण्यास पात्र असतील. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ईपीएस-95 योजनेचा आढावा: EPFO आणि कामगार मंत्रालयाने ईपीएस-95 योजनेचा सर्वसमावेशक आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पेन्शन फॉर्म्युला, योगदान दर आणि लाभ गणनेचे पुनरावलोकन केले जाईल. वाढत्या महागाईनुसार ही योजना अद्ययावत केली जाईल.
ईपीएस खातेदारांसाठी सल्ला:
सदस्यांनी पेन्शन लाभ कायम ठेवण्यासाठी संपूर्ण रक्कम काढणे टाळावे, तसेच तुमचा UAN क्रमांक आणि KYC तपशील अद्ययावत ठेवावा. बेरोजगार असल्यास 1 वर्षापर्यंत थांबून नियम काळजीपूर्वक वाचावेत.
हे देखील वाचा – Asia Cup Trophy Controversy: ‘भारताला आशिया कपची ट्रॉफी हवी असेल तर…’; उद्धट नक्वींनी BCCI समोर ठेवली नवीन अट