PF Balance check Process: ईपीएफओ (EPFO) सदस्यांच्या सोयीसाठी सरकारने एक नवीन अपडेट आणले आहे. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) खातेधारक त्यांचे पीएफ संबंधित सर्व कागदपत्रे आणि बॅलन्स (PF balance) थेट डिजिलॉकरॲपमध्ये तपासू शकतात.
यापूर्वी पीएफ बॅलन्स तपासण्याची आणि पासबुक (Passbook) डाउनलोड करण्याची सुविधा फक्त उमंग ॲपवर (UMANG App) उपलब्ध होती.
या नवीन सुविधेमुळे आता पीएफ खातेधारक आपले यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि पीएफ सर्टिफिकेट यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये पाहू शकतात.
DigiLocker ॲपमध्ये PF बॅलन्स कसा तपासायचा?
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये DigiLocker ॲप इन्स्टॉल करा.
- जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर आधी रजिस्ट्रेशन (Registration) करून अकाउंटमध्ये लॉगइन (Login) करा.
- लॉगइन केल्यानंतर, तुम्हाला तुमचे ईपीएफओ अकाउंट आधार नंबरच्या (Aadhaar number) मदतीने लिंक करावे लागेल.
- लिंक झाल्यावर तुम्ही ईपीएफओ सेक्शनमध्ये जाऊन पीएफ पासबुक, यूएएन कार्ड आणि पीपीओ डॉक्युमेंट्स पाहू शकता.
- याचसोबत, तुम्ही तुमचा लेटेस्ट पीएफ बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शनची (Transaction) माहिती देखील तपासू शकता.
इंटरनेटशिवायही पीएफ बॅलन्स तपासता येतो
जर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल, तरीही तुम्ही फक्त मिस कॉल किंवा एसएमएसद्वारे तुमचा पीएफ बॅलन्स तपासू शकता.
- मिस कॉलद्वारे: यूएएनशी (UAN) नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल द्या. त्यानंतर काही सेकंदांत तुम्हाला पीएफ बॅलन्सची माहिती एसएमएसद्वारे मिळेल.
- एसएमएसद्वारे: तुम्हाला UAN शी नोंदणीकृत असलेल्या नंबरवरून EPFOHO असा मेसेज 7738299899 या नंबरवर पाठवायचा आहे.