Home / arthmitra / Personal Loan : सॅलरी स्लिप नाही? टेन्शन घेऊ नका! पर्सनल लोन मिळवण्यासाठी ‘हे’ 4 कागदपत्रे वापरा

Personal Loan : सॅलरी स्लिप नाही? टेन्शन घेऊ नका! पर्सनल लोन मिळवण्यासाठी ‘हे’ 4 कागदपत्रे वापरा

Personal Loan : पर्सनल लोन घेण्यासाठी सामान्यतः चांगला क्रेडिट स्कोर, पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पनन पुरावा आणि सॅलरी स्लिप यांसारख्या...

By: Team Navakal
Personal Loan
Social + WhatsApp CTA

Personal Loan : पर्सनल लोन घेण्यासाठी सामान्यतः चांगला क्रेडिट स्कोर, पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पनन पुरावा आणि सॅलरी स्लिप यांसारख्या अनेक आवश्यक कागदपत्रांची गरज असते. मात्र, काही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅलरी स्लिप दिली जात नाही.

तुम्ही देखील अशाच व्यक्तींपैकी एक असाल, तर सॅलरी स्लिप नसतानाही तुम्हाला पर्सनल लोन कसे मिळू शकते, हे आम्ही सांगणार आहोत.

अनेक बँका (Bank) आणि एनबीएफसी (NBFCs) आता अशा लोकांनाही कर्ज देत आहेत, जे उत्पन्न सिद्ध करणाऱ्या इतर कागदपत्रांद्वारे त्यांची परतफेड क्षमता सिद्ध करू शकतात.

सॅलरी स्लिपशिवाय कर्ज कसे मिळेल?

बहुतांश बँका अर्जदाराने सॅलरी स्लिप दिली नाही, तरीही कर्जावर विचार करतात. मात्र, त्यासाठी अर्जदाराला त्याची उत्पन्न सिद्ध करणारे इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:

  1. मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट या स्टेटमेंटमध्ये तुमच्या खात्यात नियमित जमा होणारी रक्कम दिसून येते.
  2. मागील दोन वर्षांचे आयकर रिटर्न (ITR) आयकर रिटर्न भरल्याचे कागदपत्र तुमची वार्षिक आवक दर्शवते.
  3. फॉर्म-16 किंवा नियुक्तीपत्र फॉर्म-16 किंवा कंपनीचे नियुक्तीपत्र (Employment Letter) तुमच्या नोकरीची आणि वेतनाची माहिती देते.
  4. जीएसटी रिटर्न किंवा इतर उत्पन्न पुरावा व्यवसाय करणाऱ्या आणि फ्रीलांसर लोकांसाठी जीएसटी रिटर्न (GST Returns) महत्त्वाचे आहे. तसेच, भाडे, गुंतवणूक किंवा कमिशनमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा पुरावा.

या कागदपत्रांमुळे बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेला तुम्ही पैसे कसे हाताळता आणि कर्ज फेडण्यास किती सक्षम आहात, हे समजते. त्यामुळे सॅलरी स्लिप नसतानाही कर्ज मिळणे सोपे होते.

मजबूत क्रेडिट प्रोफाइलवर लक्ष द्या

जर तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसेल, तर कर्ज देणारी संस्था तुमचा पत मानांकन आणि क्रेडिट स्कोर अधिक बारकाईने तपासतात. यासाठी खालील गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे:

  • सिबिल स्कोर (CIBIL Score) 750 च्या वर ठेवा.
  • सर्व क्रेडिट कार्डचे बिल आणि ईएमआय (EMI) वेळेवर भरा.
  • कर्ज-ते-उत्पन्न गुणोत्तर (Debt-to-Income Ratio) संतुलित ठेवा.

योग्य संस्था आणि पर्याय निवडा

अनेक डिजिटल कर्ज देणाऱ्या संस्था, खासगी बँका आणि एनबीएफसी लवचिक कागदपत्रे प्रक्रिया देतात. ते कर्ज पास करताना तुमच्या रोख प्रवाहावर, पत नोंदीवर आणि परतफेडीच्या इतिहासावर विश्वास ठेवतात. मात्र, कर्ज घेण्यापूर्वी व्याज दर, प्रक्रिया शुल्क आणि इतर अटींची तुलना करणे महत्त्वाचे आहे.

हे देखील वाचा – IndiGo Flight : प्रवाशांसाठी दिलासा! इंडिगोने 610 कोटींचा परतावा दिला; विमानसेवा 75 टक्क्यांपर्यंत पूर्ववत

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या