Home / arthmitra / फक्त 45 पैशांत 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण! रेल्वे प्रवासी कसा घेऊ शकतात ‘या’ सुविधेचा लाभ? जाणून घ्या

फक्त 45 पैशांत 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण! रेल्वे प्रवासी कसा घेऊ शकतात ‘या’ सुविधेचा लाभ? जाणून घ्या

Indian Railways Travel Insurance

Indian Railways Travel Insurance: भारतीय रेल्वेने (Indian Railways) आपल्या प्रवाशांसाठी एक अत्यंत सोपी आणि स्वस्त सुविधा सुरू केली आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. ती म्हणजे प्रवाशांसाठी मिळणारे 10 लाख रुपयांचे (Indian Railways Travel Insurance) विमा कवच. अवघ्या 45 पैशांच्या प्रीमियममध्ये तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

रेल्वेने प्रवास करणे हे भारतातील सर्वात स्वस्त आणि आरामदायक प्रवासांपैकी एक आहे. रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अशावेळी, रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही खास सुविधा सुरू केली आहे. रेल्वेचे तिकीट ऑनलाइन बुककरताना तुम्ही 45 पैशांमध्ये अपघातापासूनते दुर्दैवी मृत्यूपासून आर्थिक संरक्षण मिळवू शकता.

रेल्वे प्रवास विमा कसा मिळवायचा?

  • हा विमा केवळ आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून तिकीट बुक करताना उपलब्ध असतो.
  • तिकीट बुक करताना, तुम्हाला प्रवासाच्या विमा पर्यायावरक्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर, संबंधित विमा कंपनी तुम्हाला ईमेल आणि एसएमएसद्वारे (SMS) माहिती पाठवेल.
  • ईमेलमधील लिंकवर क्लिक करून तुम्हाला वारसदाराची माहिती भरावी लागेल, जेणेकरून गरज पडल्यास विमा क्लेम करणे सोपे जाईल.

विम्यात काय-काय कव्हर होते?

हा विमा प्रवाशाने ट्रेनमध्ये चढल्यापासून ते ते तुमच्या स्टेशनपर्यंत पोहोचेपर्यंत लागू असतो. यामध्ये रेल्वे अपघात, चोरी, दंगल (Riots), ट्रेनमधून पडणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे. मात्र, वैयक्तिक अपघात किंवा सामानाची चोरी यांसारख्या घटनांचा यात समावेश नाही.

या विम्यांतर्गत मिळणारे फायदे:

  • अपघातात मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये.
  • आंशिक अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपये.
  • उपचारासाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च म्हणून 2 लाख रुपये.
  • पार्थिव शरीराची वाहतूक करण्यासाठी 10,000 रुपये.

ही सुविधा 5 वर्षांखालील मुलांना आणि परदेशी नागरिकांना उपलब्ध नाही, तर आरएसी (RAC) किंवा कन्फर्म तिकीट (Confirmed ticket) असलेल्या भारतीय नागरिकांना याचा लाभ घेता येतो.