Ladki Bahin Yojana payment not received and eKYC extension : महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या चर्चेत आहे. २८ जून २०२४ रोजी मान्यता मिळालेल्या या योजनेद्वारे २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा केले जातात.
मात्र, अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा महिलांसाठी सरकारने आता मदतीचा हात पुढे केला आहे.
बँकेत पैसे आले नाहीत? मग करा ‘हे’ उपाय
जर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात, तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि ई-केवायसी देखील केली आहे, तरीही पैसे मिळाले नसतील तर खालील गोष्टी करा:
१. नारीशक्ती दूत ॲप तपासा: तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉगिन करून ‘यापूर्वी केलेले अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा अर्ज Approved (मंजूर), Pending (प्रलंबित) की Rejected (नाबाद) आहे, हे पाहा.
२. जिल्हा कार्यालयाला भेट द्या: तुमच्या जिल्ह्यातील ‘महिला व बालविकास विभाग’ कार्यालयात जाऊन तुमच्या हप्त्याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकता.
३. मोफत हेल्पलाईन क्रमांक: सरकारने महिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी १८१ हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. यावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे प्रशिक्षित ऑपरेटर्स तुम्हाला तांत्रिक बाबींवर अचूक मार्गदर्शन करतील.
ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत संधी
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ई-केवायसी प्रक्रियेची मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
- मुदतवाढीचे कारण: राज्यात आलेले अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट, तसेच महिलांनी केलेली मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
- कोणाला फायदा होणार? ज्या महिलांच्या अर्जात काही चुका आहेत, ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे किंवा तांत्रिक अडचणींमुळे ज्यांची माहिती चुकीची भरली गेली आहे, अशा सर्व महिलांना आता दुरुस्तीसाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.










