Home / arthmitra / PM Kisan 22nd Installment: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ नवीन नियमामुळे अडकू शकतात पीएम किसान योजनेचा पैसे

PM Kisan 22nd Installment: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ नवीन नियमामुळे अडकू शकतात पीएम किसान योजनेचा पैसे

PM Kisan 22nd Installment New Rules : केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना चालवते. या योजनेद्वारे...

By: Team Navakal
PM Kisan 22nd Installment New Rules
Social + WhatsApp CTA

PM Kisan 22nd Installment New Rules : केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना चालवते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.

आतापर्यंत २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, आता २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. मात्र, यावेळी हप्ता मिळवण्यासाठी केवळ e-KYC करून चालणार नाही, तर सरकारने ‘युनिक फार्मर आयडी’ (Unique Farmer ID) अनिवार्य केला आहे.

काय आहे ‘युनिक फार्मर आयडी’ आणि त्याचे महत्त्व?

शेतकऱ्यांची डिजिटल ओळख म्हणून ही आयडी ओळखली जाईल. यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचा तपशील, पिकांची माहिती, खतांचा वापर आणि पशुपालनाशी संबंधित सर्व डेटा लिंक असेल. चुकीच्या व्यक्तींनी घेतलेला लाभ रोखण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

फार्मर आयडी आणि e-KYC चे फायदे

  1. सबसिडी: खते आणि बियाणांवर मिळणारी सबसिडी थेट आणि वेळेवर मिळेल.
  2. पीक विमा: विम्याचा क्लेम करताना कागदपत्रांची वारंवार गरज भासणार नाही.
  3. पारदर्शकता: सरकारी योजनांसाठी वारंवार कागदपत्रे जमा करण्याची कटकट संपेल.

फार्मर आयडी कार्ड कसे बनवायचे?

शेतकरी आपल्या राज्याच्या ‘AgriStack’ किंवा संबंधित कृषी पोर्टलवर नोंदणी करू शकतात. यासाठी आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि जमिनीचे दस्तऐवज (सातबारा/उतारा) आवश्यक आहेत. अनेक राज्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर यासाठी विशेष कॅम्पही लावले जात आहेत.

e-KYC करण्याची सोपी पद्धत

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC केलेले नाही, त्यांनी त्वरित pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन खालील स्टेप्स पूर्ण कराव्यात:

  • वेबसाईटवरील “e-KYC” पर्यायावर क्लिक करा.
  • आपला आधार क्रमांक आणि लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
  • याशिवाय जवळच्या सीएससी (CSC) सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही

  • पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
  • जर कुटुंबातील कोणीही प्राप्तिकर (Income Tax) भरत असेल, तर त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
  • स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले (भाड्याने शेती करणारे) शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • घटनात्मक पदावर असलेले व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब या लाभासाठी पात्र नाही.

काही अडचण असल्यास शेतकरी १०-२३३८१०९२ या हेल्पलाइन नंबरवर किंवा pmkisan-ict@gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

हे देखील वाचा – MG Windsor EV : टाटा मोटर्सला मोठा धक्का! ‘ही’ ठरली 2025 मधील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार; पाहा खासियत

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या