Home / arthmitra / PM Kisan Yojana : PM किसान योजनेचे पुढील हप्ता लवकरच येणार; पैसे मिळण्यासाठी ‘हे’ काम लवकरच पूर्ण करा

PM Kisan Yojana : PM किसान योजनेचे पुढील हप्ता लवकरच येणार; पैसे मिळण्यासाठी ‘हे’ काम लवकरच पूर्ण करा

PM Kisan Yojana 21st Installment : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान...

By: Team Navakal
PM Kisan Yojana : PM किसान योजनेचे पुढील हप्ता लवकरच येणार; पैसे मिळण्यासाठी 'हे' काम लवकरच पूर्ण करा
Social + WhatsApp CTA

PM Kisan Yojana 21st Installment : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan Scheme) 21 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पुढील हप्त्याचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी त्यांनी आपले स्टेटस तपासावे आणि आवश्यक e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी.

PM Kisan Yojana: नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात हप्ता

रिपोर्टनुसार, PM किसान योजनेचा 21 वा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जारी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सरकारने अद्याप अंतिम तारीख जाहीर केलेली नाही.

यापूर्वी, 7 ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 8.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 171 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती.

PM Kisan Yojana: e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य

PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे, हप्ता अडकू नये म्हणून शेतकऱ्यांनी त्वरित pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले स्टेटस तपासावे आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. जर कोणी पात्र असूनही अर्ज केला नसेल, तर त्यांनी पुढील हप्त्यापासून लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करावा.

योजनेतील पात्रता आणि लाभ

ही योजना केंद्र सरकारची असून, त्याअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा केली जाते. या योजनेचा लाभ सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना मिळतो.

विशेष म्हणजे, आता जमिनीच्या आकाराची मर्यादा पात्रता निकषातून वगळण्यात आली आहे. म्हणजे, दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेले शेतकरी कुटुंबही या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

सध्या काही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू असली तरी, PM किसान योजनेचा हप्ता जारी करण्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तांत्रिक औपचारिकता पूर्ण होताच, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

हे देखील वाचा –  ChatGPT Go भारतीयांसाठी 1 वर्षासाठी मोफत; कसा मिळेल फ्री ॲक्सेस? जाणून घ्या

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या