Home / arthmitra / PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

PM Kisan Yojana 21st Instalment : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान...

By: Team Navakal
PM Kisan Yojana
Social + WhatsApp CTA

PM Kisan Yojana 21st Instalment : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 नोव्हेंबर रोजी या योजनेचा 21 वा हप्ता जारी करणार आहेत.

या योजनेनुसार, प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता 2,000 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात मिळते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी 19 नोव्हेंबरची तयारी करायला हवी, पण त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे.

योजनेची व्याप्ती आणि पारदर्शक वितरण

24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेल्या या केंद्र सरकारच्या योजनेतून प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपयांची मदत दिली जाते. सरकारी आकडेवारीनुसार, या कार्यक्रमातून आतापर्यंत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना 3.70 लाख कोटी रुपयांची मदत पोहोचवण्यात आली आहे.

डिजिटल फिनटेक (Fintech) तंत्रज्ञानाच्या मदतीने पीएम-किसानसारख्या योजनांची अंमलबजावणी जलद आणि पारदर्शक झाली आहे. ही योजना आधारशी जोडलेली असल्याने, ई-केवायसी (e-KYC), मोबाईल अॅप (Mobile App) आणि किसान-ई-मित्र प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने लाभ थेट योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो.

तक्रार निवारण आणि 11 भाषांमध्ये मदत

शेतकऱ्यांच्या समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी पीएम किसान पोर्टल आणि सीपीआरएएमएस (CPGRAMS) प्रणालीवर तक्रार नोंदणीची सुविधा आहे.

यासोबतच, शेतकऱ्यांसाठी किसान-ई-मित्र चॅटबॉट (Chatbot) देखील उपलब्ध आहे. हा चॅटबॉट भाषिक अडचणी दूर करण्यासाठी हिंदी, इंग्रजी, तमिळ, बंगाली, ओडिया, मल्याळम, गुजराती, पंजाबी, तेलुगु, मराठी आणि कन्नडसह 11 प्रमुख भाषांमध्ये माहिती आणि मदत पुरवतो.

यामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळवणे आणि समस्या सोडवणे अधिक सोपे झाले आहे. सामाजिक कल्याण योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी सरकारने किसान रजिस्ट्री देखील सुरू केली आहे.

हे देखील वाचा – IPL Trade : संजू सॅमसन CSK मध्ये तर रवींद्र जडेजाची RR मध्ये घरवापसी, जाणून घ्या किती मध्ये झाली ट्रेड डील?

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या