Home / arthmitra / RBI Action on Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन महागात! आरबीआयचा बँक ऑफ महाराष्ट्रसह 5 संस्थांना मोठा दंड; कारण काय?

RBI Action on Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन महागात! आरबीआयचा बँक ऑफ महाराष्ट्रसह 5 संस्थांना मोठा दंड; कारण काय?

RBI Action on Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध आरबीआयने आता मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रसह ५...

By: Team Navakal
RBI Action on Banks
Social + WhatsApp CTA

RBI Action on Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध आरबीआयने आता मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रसह ५ मोठ्या वित्तीय संस्थांना दंड ठोठावण्यात आला आहे, तर उत्तर प्रदेशातील एका सहकारी बँकेचा परवाना पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रवर ३२.५० लाखांचा दंड

आरबीआयने ६ फेब्रुवारीच्या आदेशानुसार बँक ऑफ महाराष्ट्रला ३२.५० लाख रुपयांचा दंड केला आहे. बँकेने स्वयंसहायता गटांच्या सदस्यांची महत्त्वाची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना दिली नव्हती. तसेच ‘केवायसी’ (KYC) संदर्भातील काही त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

इतर संस्थांवरील कारवाईचा तपशील:

1. सीएसबी बँक लिमिटेड (CSB Bank): या बँकेवर सर्वात मोठा म्हणजेच 63.60 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय बचत खात्यांवर शुल्क आकारणे आणि बिझनेस करस्पाँडन्ट नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका बँकेवर ठेवण्यात आला आहे.

2. डीसीबी बँक (DCB Bank): अकृषिक सोने तारण कर्जाच्या संदर्भात ‘लोन टू व्हॅल्यू’ (LTV) चे प्रमाण न राखल्यामुळे या बँकेला 29.60 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

3. नावी फिनसर्व्ह (Navi Finserv): रिकव्हरी एजंट्सच्या माध्यमातून ग्राहकांना त्रास दिल्याप्रकरणी या कंपनीला 3.80 लाख रुपयांचा दंड झाला आहे. नियमानुसार सकाळी ८ पूर्वी आणि सायंकाळी ७ नंतर ग्राहकांशी संपर्क साधण्यास मनाई असतानाही कंपनीने या नियमांचे उल्लंघन केले होते.

4. आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance): मालमत्ता वर्गीकरण (Asset Classification) संदर्भातील त्रुटींमुळे या फायनान्स कंपनीला 5.30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बँकेचा परवाना रद्द

आरबीआयने लखनौ येथील इंडियन मर्चंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना ११ फेब्रुवारीच्या आदेशानुसार रद्द केला आहे. १३ फेब्रुवारीच्या कामकाजानंतर ही बँक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुरेशी भांडवल क्षमता आणि भविष्यातील उत्पन्नाच्या संधी नसल्याने ही कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या