Home / arthmitra / RBI चा मोठा निर्णय! आता प्रत्येक बँकेत ‘हे’ खाते अनिवार्य; ‘झिरो बॅलन्स’सह मिळणार अनेक मोफत सुविधा

RBI चा मोठा निर्णय! आता प्रत्येक बँकेत ‘हे’ खाते अनिवार्य; ‘झिरो बॅलन्स’सह मिळणार अनेक मोफत सुविधा

RBI BSBD Account: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशातील वित्तीय समावेशन आणि डिजिटायझेशनला अधिक गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मसुदा परिपत्रक...

By: Team Navakal
RBI BSBD Account

RBI BSBD Account: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशातील वित्तीय समावेशन आणि डिजिटायझेशनला अधिक गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मसुदा परिपत्रक जारी केला आहे. यानुसार, सर्व बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ (BSBD) खाते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

या खात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते ‘झिरो बॅलन्स’वर उघडले जाईल आणि त्यासाठी कोणत्याही किमान शिल्लक रकमेची अट नसेल.

‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खाते म्हणजे काय?

BSBD खाते हे प्रधान मंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत उघडलेल्या खात्यांप्रमाणेच असते. ज्या व्यक्तींचे कोणत्याही बँकेत दुसरे खाते नाही, त्यांना हे खाते कोणत्याही बँक शाखेत किंवा बँक मित्र आउटलेटवर उघडता येते. सध्या देशात 56.6 कोटींहून अधिक जन धन खातेधारक आहेत, ज्यात 2.67 ट्रिलियन रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे.

RBI ने म्हटले आहे की, बँकिंग क्षेत्राच्या डिजिटायझेशनमुळे ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत. BSBD खातेधारकांसाठी ग्राहक सेवा सुधारणे आणि वित्तीय समावेशन अधिक सखोल करण्यासाठी हे नियम जारी केले आहेत.

BSBD खात्यामध्ये मिळणाऱ्या मोफत सुविधा

RBI च्या मसुद्यानुसार, बँकांना BSBD खातेधारकांना खालील सुविधा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय देणे अनिवार्य असेल:

  • अमर्याद ठेवी : रोख, इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स आणि ATM/कॅश डिपॉझिट मशीन्स (CDM) द्वारे अमर्याद ठेवी जमा करण्याची सुविधा.
  • मोफत ATM/डेबिट कार्ड (Debit Card).
  • चेकबुक: वर्षाला किमान 25 पानांचे चेकबुक मोफत.
  • डिजिटल बँकिंग: इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा.
  • पासबुक/स्टेटमेंट: पासबुक किंवा मासिक स्टेटमेंट मोफत.
  • मोफत पैसे काढण्याची मर्यादा: दरमहा किमान चार वेळा मोफत पैसे काढण्याची (ATM वापर आणि ट्रान्सफर्ससह) सुविधा.

डिजिटल व्यवहार अमर्याद:

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT), रियल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS), इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS) आणि पॉइंट ऑफ सेल (PoS) द्वारे होणारे डिजिटल व्यवहार अमर्याद आणि मोफत असतील.

खाते उघडण्याचे आणि नियमांचे महत्त्वाचे तपशील

  • एकच खाते: BSBD खातेधारक देशातील कोणत्याही बँकेत दुसरे BSBD खाते उघडण्यास पात्र नसतील.
  • घोषणापत्र अनिवार्य: खाते उघडण्यापूर्वी ग्राहकांना याबद्दल घोषणापत्र देणे आवश्यक आहे.
  • इतर खात्यांचे काय? BSBD खातेधारक त्याच बँकेत दुसरे बचत खाते उघडण्यास पात्र नसतील.
  • टर्म डिपॉझिटला मुभा: मात्र, ग्राहक मुदत ठेव खाती उघडू शकतात.
  • खाते रूपांतरण: ग्राहक आपले सध्याचे बचत खाते सात दिवसांच्या आत BSBD खात्यामध्ये रूपांतरित करू शकतात. तसेच, BSBD खाते उघडल्यास, त्याच बँकेतील इतर बचत खाती 30 दिवसांच्या आत बंद करावी लागतील.

हे देखील वाचा – महाराष्ट्रात ई-बाँड प्रणाली लागू; आयात-निर्यात व्यवहारांसाठी पेपर बाँड्सचा वापर थांबणार, व्यापाराला गती

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या