Home / arthmitra / डिजिटल पेमेंट होणार अधिक सुरक्षित! RBI ने UPI आणि कार्ड व्यवहारांसाठी लागू केले ‘हे’ नियम

डिजिटल पेमेंट होणार अधिक सुरक्षित! RBI ने UPI आणि कार्ड व्यवहारांसाठी लागू केले ‘हे’ नियम

RBI Digital Payment : देशात डिजिटल पेमेंट (Digital Payment) प्रणालीचा वेगाने विस्तार होत असताना, ग्राहकांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी रिझर्व्ह बँक...

By: Team Navakal
RBI Digital Payment

RBI Digital Payment : देशात डिजिटल पेमेंट (Digital Payment) प्रणालीचा वेगाने विस्तार होत असताना, ग्राहकांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने (RBI) एक महत्त्वाचा आणि व्यापक नियम जारी केला आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून डिजिटल पेमेंट्ससाठी ऑथेंटिकेशन यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी हा नवीन आराखडा लागू करण्यात येणार आहे.

सध्या बहुतांश डिजिटल पेमेंटसाठी सुरक्षेचा अतिरिक्त घटक म्हणून एसएमएस-आधारित ओटीपी (SMS-based OTP) वापरला जातो. UPI, कार्ड आणि वॉलेट-आधारित प्लॅटफॉर्म यांसारख्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर RBI ने हा निर्णय घेतला आहे.

RBI चे नवीन नियम: ‘टू-फॅक्टर’ आणि ‘डायनॅमिक ऑथेंटिकेशन’

नवीन नियमांनुसार, सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांना ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (Two-Factor Authentication) बंधनकारक असेल. RBI ने विशिष्ट पद्धती अनिवार्य केल्या नसतानाही, या सुरक्षा प्रणालीमध्ये किमान दोन घटक असणे आवश्यक आहे. ज्यात पासवर्ड किंवा PIN, कार्ड, हार्डवेअर टोकन किंवा सॉफ्टवेअर टोकन आणि फिंगरप्रिंट किंवा आधार-आधारित बायोमेट्रिक ओळखचा समावेश आहे.

जोखीम व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी RBI ने जारीकर्त्यांना काही व्यवहारांसाठी जोखीम-आधारित दृष्टिकोन स्वीकारण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की, पेमेंट पुरवठादार आता ग्राहकांचे स्थान, डिव्हाइसचे तपशील किंवा मागील व्यवहाराचा इतिहास यांसारख्या निकषांवर व्यवहारांचे मूल्यांकन करतील.

RBI ने नवीन परिपत्रकात म्हटले आहे की, “व्यवहाराशी संबंधित असलेल्या जोखमीनुसार, किमान टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या पलीकडे अतिरिक्त तपासणी केली जाऊ शकते.”

जास्त धोका असलेल्या व्यवहारांमध्ये नोटिफिकेशन आणि कन्फर्मेशनसाठी डिजीलॉकरचा वापर करण्याचे निर्देशही RBI ने दिले आहेत.

हे देखील वाचा –  पंतप्रधान मोदींच्या सभेत ‘ती’ एक चूक; थेट IAS अधिकाऱ्याला पदावरून हटवले

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या