SBI FD Rates : तुमचे पैसे SBI मध्ये गुंतवलेले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या लाखो ठेवीदारांना धक्का देत स्थिर ठेवींच्या (एफडी) व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (MPC) नुकताच रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सची कपात करून तो 5.50% वरून 5.25% इतका केला होता. या पार्श्वभूमीवर बँकेने हे पाऊल उचलले आहे. हे नवीन दर सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक या दोघांनाही लागू होतील.
काय असतील नवीन व्याजदर?
एसबीआयने दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर 6.45% वरून 6.40% केला आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी तो 6.95% वरून 6.90% करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, ‘अमृत वृष्टी’ नावाच्या 444 दिवसांच्या विशेष योजनेवरील व्याजदर 6.60% वरून 6.45% करण्यात आला आहे.
एफडीचे नवीन दर
| जमा कालावधी | सामान्य नागरिकांसाठी व्याज दर | ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर |
| 7 ते 45 दिवस | 3.05% | 3.55% |
| 46 ते 179 दिवस | 4.90% | 5.40% |
| 180 ते 210 दिवस | 5.65% | 6.15% |
| 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी | 5.90% | 6.40% |
| 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी | 6.25% | 6.75% |
| 2 ते 3 वर्षांचा कालावधी | 6.40% | 6.90% |
| 3 ते 5 वर्षांपेक्षा कमी | 6.30% | 6.80% |
| 5 ते 10 वर्ष | 6.05% | 7.05% |
MCLR दरांमध्येही बदल
बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स (MCLR) मध्येही कपात केली आहे. या बदलामुळे कर्ज घेणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
| कालावधी | जुना MCLR | नवीन MCLR |
| रात्रभर | 7.90% | 7.85% |
| 1 महिना | 7.90% | 7.85% |
| 3 महिने | 8.30% | 8.25% |
| 6 महिने | 8.65% | 8.60% |
| 1 वर्ष | 8.75% | 8.70% |
| 2 वर्ष | 8.75% | 8.70% |
| 3 वर्ष | 8.85% | 8.80% |
कोणाला मिळेल जास्त फायदा?
बँकेने स्पष्ट केले आहे की, 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर आता सामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त 6.05% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.05% पर्यंत व्याज मिळेल. या सुधारित दरांमुळे ठेवीदारांचे उत्पन्न थोडे कमी होईल, तर कर्जदारांना मात्र दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रेपो दरातील घसरणीचा परिणाम पुढे जाऊन गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या दरांवरही दिसू शकतो. बाजारदरातील बदलांशी संतुलन राखण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे बँकेने सांगितले आहे.
हे देखील वाचा – फक्त 21 हजार रुपयांमध्ये खरेदी करा Mahindra XUV 7XO, बुकिंग सुरू; पाहा या SUV मध्ये काय खास आहे?









