Home / arthmitra / Zomato च्या ग्राहकांना मोठा झटका! जेवण मागवण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे

Zomato च्या ग्राहकांना मोठा झटका! जेवण मागवण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे

Zomato Platform Fee

Zomato Platform Fee: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने पुन्हा एकदा ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आपलं प्लॅटफॉर्म शुल्क 20% ने वाढवलं असून, आता प्रत्येक ऑर्डरवर 10 रुपयांऐवजी 12 रुपये शुल्क आकारले जाईल. हा निर्णय देशभरातील सर्व शहरांमध्ये लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका वर्षाच्या आत कंपनीने तिसऱ्यांदा ही दरवाढ केली आहे.

वारंवार शुल्कवाढ

गेल्या वर्षाच्या सणासुदीच्या काळात, Zomato ने प्लॅटफॉर्म शुल्क 6 रुपयांवरून 10 रुपयांपर्यंत वाढवले होते. त्यापूर्वी, फक्त तीन महिन्यांपूर्वीच हे शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये केले होते. आता पुन्हा एकदा शुल्क वाढवून ते 12 रुपयांवर पोहोचले आहे. सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

स्पर्धा आणि आर्थिक स्थिती

Zomato च्या या निर्णयापूर्वीच प्रतिस्पर्धी Swiggy ने गेल्या महिन्यात काही ठिकाणी 14 रुपयांपर्यंत प्लॅटफॉर्म शुल्क आकारले होते. यामुळे फूड डिलिव्हरी मार्केटमधील स्पर्धा आणखी वाढली आहे. तसेच, रॅपिडो (Rapido) सारखी कंपन्याही फूड डिलिव्हरीमध्ये आपला वाटा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, Zomato ची मूळ कंपनी Eternal Ltd ने जून 2025 मध्ये संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 36% घट नोंदवली. मार्च तिमाहीतील 39 कोटींच्या तुलनेत हा नफा 25 कोटींवर आला आहे. फ्लॅटफॉर्म शुल्क वाढवण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

11व्या शतकातील अंबरनाथमधील शिवमंदिर धोक्यात! बेकायदेशीर बांधकामाचा आरोप; नेमका वाद काय?

आता मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळणार का? हैदराबाद-सातारा गॅझेट नेमके काय आहे? वाचा

अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; व्हिसाचे नियम बदलले, ‘या’ चुका महागात पडणार