मुंबई- मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे आज निधन झाले. रंगोत्सव सुरु असतांना रंगमंचावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये ही माहिती देण्यात आली.
राजेश देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आमचे ज्येष्ठ मित्र सतीश जोशी यांचे रंगोत्सवात स्टेजवरच निधन झाले. जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता. ओम शांती.. सतीश जोशी यांच्या अनेक मराठी चित्रपट व मालिकांमधील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.