Home / देश-विदेश / इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत मॉडेल तरुणीची आत्महत्या

इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत मॉडेल तरुणीची आत्महत्या

सुरत – सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तरूणीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक रील शेअर करत आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. अंजली वरमोरा (२३)...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


सुरत – सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तरूणीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक रील शेअर करत आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. अंजली वरमोरा (२३) असे या मॉडेलचे नाव आहे.सुरतमध्ये एका महिन्यात मॉडेलने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे.
मृत्यूच्या एक दिवस आधी अंजलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने एका गुजराती विरहगीताचा वापर केला होता. या गाण्यासोबत तिने लिहिले की, आज मला जाणवले की तू माझ्यासाठी काहीच नाहीस.
तिच्या या पोस्टमुळे तिचा प्रेमभंग झाला असावा,अशी चर्चा सुरू झाली आहे. याआधीही अंजलीने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केल्या होत्या.एका पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, जेव्हा तुम्ही सर्वकाही गमावता तेव्हा तुम्हाला कसलीही फिकीर नसते.पण जेव्हा तुमचे प्रेम हरवते तेव्हा ह्रदयाला वेदना होतात.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या