Home / देश-विदेश / अल-कादिर ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणइम्रान खान यांची सुटका होणार?

अल-कादिर ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणइम्रान खान यांची सुटका होणार?

इस्लामाबाद- अल-कादिर ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणी पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सुटका होण्याची शक्यता...

By: Team Navakal
Imran Khan

इस्लामाबाद- अल-कादिर ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणी पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सुटका होण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या पक्षाच्या नेत्याचे गोहर अली खान यांनी म्हटले. या याचिकेवर ११ जून रोजी सुनावणी होणार आहे.
इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना १९० दशलक्ष पौंडांच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका इम्रान खान यांच्या वतीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. इम्रान खान २०२३ च्या ऑगस्ट महिन्यापासून अदियाला तुरुंगात आहेत. त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले. त्यातील अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांची सुटका होईल, अशी आशा गोहर अली खान यांनी व्यक्त केली आहे. ११ जून हा दिवस इम्रान खान आणि बुशरा बिबी या दोघांसाठी महत्वाचा दिवस ठरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल-कादिर ट्रस्ट प्रकरणाची सुनावणी लांबणीवर टाकली होती. शनिवारपर्यंत इम्रान खान यांच्या सुटकेसाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा पीटीआयच्या वतीने यापुर्वी देण्यात आला होता. देशाला वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील पीटीआयच्यावतीने करण्यात आले होते.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या