Home / देश-विदेश / आंध्रप्रदेशमध्ये जास्त मुले जन्माला घालण्यासाठी सरकार पैसे देणार

आंध्रप्रदेशमध्ये जास्त मुले जन्माला घालण्यासाठी सरकार पैसे देणार

अमरावती – आंध्रप्रदेशमधील घटत्या प्रजनन दराचा सामना करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी...

By: Team Navakal

अमरावती – आंध्रप्रदेशमधील घटत्या प्रजनन दराचा सामना करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. याअंतर्गत, जास्त मुले असलेल्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, महिला कर्मचाऱ्यांना अमर्याद मातृत्व रजांचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, राज्याची लोकसंख्या आता टिकवणे गरजेचे झाले आहे. मानव भांडवलात गुंतवणूक करून, मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहित केल्यास समाजाचा समतोल राखता येईल. यासाठी आम्ही झिरो पॉव्हर्टी नावाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात श्रीमंत नागरिक गरीब कुटुंबांना दत्तक घेणार आहेत.
राज्य सरकारने याशिवाय पंचायत व नगरपालिका निवडणुकीसाठी लागू असलेली दोन मुलांची अटही मागे घेतली आहे. आता जास्त मुले असणाऱ्या व्यक्तींनाही निवडणुका लढवता येणार आहेत. तसेच, प्रत्येक शालेय विद्यार्थ्यासाठी १५,००० रुपयांची मदत थेट त्यांच्या आईच्या खात्यात जमा केली जाणार आहे. कार्यस्थळी बालसंगोपन केंद्र (चाईल्ड केअर सेंटर) असणे आता सर्व संस्थांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लोकसंख्येचा समतोल राखण्याबरोबरच गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या