Home / देश-विदेश / इस्रायलने जप्त केले ग्रेटा थनबर्गचे जहाज

इस्रायलने जप्त केले ग्रेटा थनबर्गचे जहाज

तेल अवीव- गाझातील लोकांसाठी मदतसामुग्री घेऊन आलेल्या ग्रेटा थनबर्ग या स्वयंसेवी महिलेचे जहाज आज इस्रायलने जप्त केले. हे जहाज गाझापट्टीतील...

By: Team Navakal


तेल अवीव- गाझातील लोकांसाठी मदतसामुग्री घेऊन आलेल्या ग्रेटा थनबर्ग या स्वयंसेवी महिलेचे जहाज आज इस्रायलने जप्त केले. हे जहाज गाझापट्टीतील लोकांना ईदनिमित्त मदत साहित्य वाटणार होते. गाझाच्या समुद्रावर सध्या इस्रायलचा कब्जा असून हे जहाज जप्त करण्याचा इशारा इस्रायलने या आधीच दिला होता.
हे जहाज ग्रेटा थनबर्ग ही २२ वर्षाची स्विडीश पर्यावरण कार्यकर्ती घेऊन आली होती. गाझाची पहिली महिला मच्छिमार मॅडलीन हिच्या नावावर या जहाजाचे नाव ठेवण्यात आले होते. ब्रिटनचा झेंडा असलेल्या या जहाजाने १ जून रोजी इटली च्या सिसिली बेटावरुन आपला प्रवास सुरु केला होता. या जहाजावर अन्नधान्य, औषधे व इतर साहित्य होते. ग्रेटाबरोबर इतर ११ स्वयंसेवक होते. हे जहाज इस्रायलने जप्त करुन ते इस्रायलच्या दिशेने नेले आहे. या जहाजावर असलेल्या युरोपीयन संसदेच्या सदस्या रीमा हसन यांनी आपल्या समाजमाध्यमावर ही माहिती दिली. काल रात्री २ वाजता इस्रायलने अनेक नौकांनी या जहाजाला घेरले व ते इस्रायलच्या दिशेने नेल. गेल्या काही दिवसांपासून या जहाजाची मोठी चर्चा होती. अनेक प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमावरही व्हायरल झालेल्या या जहाजाच्या फेरीची इस्रायलचे परराष्ट्र मंत्र्यानी खिल्ली उडवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा खेळ संपला आहे. सेलिब्रिटींचे सेल्फी जहाज आता इस्रायलच्या किनाऱ्याच्या दिशेने गेले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या