Home / देश-विदेश / कोलंबियात राष्ट्रपती पदाचे उमेदवार उरीबेंवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक

कोलंबियात राष्ट्रपती पदाचे उमेदवार उरीबेंवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक

बोगोटा – दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर काल सायंकाळी निवडणूक प्रचारादरम्यान १५ वर्षीय हल्लेखोराने गोळीबार केला....

By: Team Navakal

बोगोटा – दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर काल सायंकाळी निवडणूक प्रचारादरम्यान १५ वर्षीय हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी घटनास्थळावरून हल्लेखोराला अटक केली.
कोलंबियामध्ये २०२६ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत.मिगुएल उरीबे हे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात.३९ वर्षीय उरीबे हे विरोधी सेंट्रो डेमोक्रॅटिको कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. ते राजधानी बोगोटा येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी १५ वर्षीय हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेबाबत सेंट्रो डेमोक्रॅटिको कंझर्व्हेटिव्ह पक्षानेही निवेदन जारी करून उरीबे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली. मिगुएल उरीबे हे प्रसिद्ध कोलंबियन पत्रकार डायना टर्बे यांचे पुत्र आहेत. ज्यांची १९९१ मध्ये ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारच्या मेडेलिन कार्टेलने बोगोटा येथे अपहरण केले होते.डायना तत्कालीन काळातील प्रसिद्ध पत्रकार होत्या. त्या सातत्याने ड्रग्ज तस्करी आणि संघटित गुन्हेगारीविरुद्ध लिहित. या मोहिमेदरम्यान त्यांनी जीव गमावला होता. याशिवाय कोलंबियाचे २५ वे राष्ट्रपती ज्युलिओ सीझर यांचे ते नातू आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या